आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी

आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी

मुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. अॅपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या २९४ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कूपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशांचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी अॅपवर नोंदवण्यात आल्या. अॅपच्या साहाय्याने सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्याखालोखाल ठाणे ६८, सोलापूर ६१, मुंबई उपनगर ४५, तर मुंबई शहर येथे ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगर ३५, अकोला ११, अमरावती ११, औरंगाबाद १२, बीड ८, भंडारा २, बुलडाणा १३, चंद्रपूर ३, धुळे २, गडचिरोली २, गोंदिया ३, हिंगोली ७, जळगाव २०, जालना १, कोल्हापूर १८, लातूर ११, नागपूर ३०, नंदूरबार २, नाशिक २२, उस्मानाबाद ८, पालघर २४, परभणी ७, रायगड ८, रत्नागिरी ४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदुर्ग १९, वर्धा १४, वाशीम ६, तर यवतमाळ जिल्ह्यातून २ तक्रारी नोंदवण्यात आल्या. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अॅपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सी व्हिजिल मोबाईल अॅप हे डाउनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com