agriculture news in Marathi, 717 completes of code of conduct, Maharashtra | Agrowon

आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.

मुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.

अॅपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या २९४ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत.

संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कूपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशांचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी अॅपवर नोंदवण्यात आल्या.

अॅपच्या साहाय्याने सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्याखालोखाल ठाणे ६८, सोलापूर ६१, मुंबई उपनगर ४५, तर मुंबई शहर येथे ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगर ३५, अकोला ११, अमरावती ११, औरंगाबाद १२, बीड ८, भंडारा २, बुलडाणा १३, चंद्रपूर ३, धुळे २, गडचिरोली २, गोंदिया ३, हिंगोली ७, जळगाव २०, जालना १, कोल्हापूर १८, लातूर ११, नागपूर ३०, नंदूरबार २, नाशिक २२, उस्मानाबाद ८, पालघर २४, परभणी ७, रायगड ८, रत्नागिरी ४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदुर्ग १९, वर्धा १४, वाशीम ६, तर यवतमाळ जिल्ह्यातून २ तक्रारी नोंदवण्यात आल्या.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अॅपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सी व्हिजिल मोबाईल अॅप हे डाउनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होतो. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...