agriculture news in Marathi, 718 dead in Monsoon season, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यू
वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढावली. याचा सर्वात जास्त सात राज्यांना फटका बसला या राज्यांमध्ये पाऊस आणि पूर या घटनांमध्ये आतापर्यंत ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढावली. याचा सर्वात जास्त सात राज्यांना फटका बसला या राज्यांमध्ये पाऊस आणि पूर या घटनांमध्ये आतापर्यंत ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. 

यंदा देशात मॉन्सून वेळेच्या आधीच दाखल झाल्याने बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या वेळी पाऊस आणि पुरामुळे अनेक राज्यांमध्ये जीवितहानी झाली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि नागालॅंड या राज्यांमध्ये आतापर्यंत ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात १७१, पश्चिम बंगालमध्ये १७०, केरळमध्ये १७८, महाराष्ट्रात १३९, गुजरातमध्ये ५२, आसामध्ये ४४ आणि नागालॅंडमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्ये २१ आणि पश्चिम बंगालमध्ये ५ असे २६ लोक बेपत्ता आहेत. तसेच पूर आणि पावसाच्या घटनांमध्ये एकूण २४४ लोक जखमी झाले आहेत. 

राज्यनिहाय मृतांची संख्या अशी
सात राज्यांमध्ये आतापर्यंत ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या मॉन्सूनच्या काळात उत्तर प्रदेशात १७१ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये १७० जणांचा, केरळमध्ये १७८ आणि महाराष्ट्रात १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुजरातमध्ये ५२, आसामध्ये ४४ आणि नागालॅंडमध्ये ८ जणांचा मृत्यू पाऊस आणि पुराच्या घटनेमध्ये झाला आहे. 

अनेक जिल्ह्यांना फटका
पुराचा देशातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम बंगालमधील २२, आसाममधील २३ जिल्ह्यांना तर केरळमध्ये १४, उत्तर प्रदेशात १२, नागालॅंडमध्ये ११ आणि गुजरातमध्ये १० जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये ११.४५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. येथे २७ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...