agriculture news in Marathi, 72. 83 thousand tonnes of sugarcane crushing in Nanded division | Agrowon

नांदेड विभागात ७२ लाख ८३ हजार टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

नांदेड ः प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागाअंतर्गतच्या चार जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी बुधवार(ता. १३)पर्यंत ७२ लाख ८३ हजार ६४९ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.०८ टक्के साखर उतारा आला असून, एकूण ८० लाख ७३ हजार १९५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन आणि नांदेड जिल्ह्यतील एक असे एकूण तीन साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपले आहेत.

नांदेड ः प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागाअंतर्गतच्या चार जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी बुधवार(ता. १३)पर्यंत ७२ लाख ८३ हजार ६४९ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.०८ टक्के साखर उतारा आला असून, एकूण ८० लाख ७३ हजार १९५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन आणि नांदेड जिल्ह्यतील एक असे एकूण तीन साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपले आहेत.

परभणी जिल्ह्यातील पाच खासगी साखर कारखान्यांनी २० लाख ५८० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.६८ टक्के साखर उतारा आला असून एकूण २१ लाख ४२ हजार ६३० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गंगाखेड शुगर्सने सर्वाधिक ८ लाख ८४ हजार २१० टन ऊस गाळप केले असून ८ लाख ९९ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.६८ टक्के आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ४ सहकारी आणि १ खासगी असे ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण १० लाख ७१ हजार १८९ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.२७ टक्के साखर उतारा आला असून एकूण १२ लाख ७ हजार २७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

पूर्णा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ४ लाख ३५ हजार ९७० टन ऊस गाळप केले असून ४ लाख ९६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण युनिट २ या  साखर कारखान्याचा साखर उतार सर्वाधिक ११.७८ टक्के आला असून हा कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाला आहे. शिरुर येथील कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी असे एकूण ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ११ लाख ३२ हजार ७७० टन उसाचे गाळप केले आहे. 

सरासरी १०.९९ टक्के साखर उतारा आला असून एकूण १२ लाख ४४ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतेले आहे. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने सर्वाधिक ३ लाख ७८ हजार ६९० टन ऊस गाळप केले असून, ४ लाख २२ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ४ चा साखर उतारा सर्वाधिक ११.६२ टक्के आला आहे. 

लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी असे एकूण ८ साखर कारखान्यांनी एकूण ३० लाख ७३ हजार ८४० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.३२ टक्के साखर उतारा आला असून एकूण ३४ लाख ७८ हजार ४९५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. मांजरा साखर कारखान्याने सर्वाधिक ६ लाख ६ हजार ७० टन उसाचे गाळप केले असून, ७ लाख १६ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पन्नगेश्वर साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.९५ टक्के आला आहे.

नांदेड विभाग गाळप हंगाम स्थिती 
(ऊस गाळप टनामध्ये, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
परभणी २००५८५० २१४२६३० १०.६८
हिंगोली १०७११८९ १२०७२७० ११.२७
नांदेड ११३२७७० १२४४८०० १०.९९
लातूर ३०७३८४० ३४७८४९५ ११.३२

 

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...