agriculture news in marathi, 724 women candidate contesting for loksabha 2019 | Agrowon

देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात हजार ९२८ उमेदवारांमध्ये ७२४ महिला होत्या. गुरुवारी (ता. २३) मतमोजणीनंतर विजय व पराभवाचा काटा कोणाकडे सरकणार, त्याबद्दल उत्सुकता आहे. कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक ५४ महिलांना यंदा उमेदवारी दिली. त्याखालोखाल सत्ताधारी भाजपकडून ५३ महिलांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ एकच महिलेला उमेदवारी दिली आहे.

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात हजार ९२८ उमेदवारांमध्ये ७२४ महिला होत्या. गुरुवारी (ता. २३) मतमोजणीनंतर विजय व पराभवाचा काटा कोणाकडे सरकणार, त्याबद्दल उत्सुकता आहे. कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक ५४ महिलांना यंदा उमेदवारी दिली. त्याखालोखाल सत्ताधारी भाजपकडून ५३ महिलांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ एकच महिलेला उमेदवारी दिली आहे.

महिला उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीचे विश्‍लेषण "असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म'ने (एडीआर) केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली. राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवारांचे द्विशतक झाले असून, त्यांची संख्या तब्बल २२२ आहे. केवळ आम आदमी पक्षानेच तृतीयपंथीयाला उमेदवारी दिली आहे. सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपच्या हेमामालिनी ठरल्या आहेत. त्यांच्या नावावर २५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २१ व्या शतकातही महिला शिक्षणापासून दूर असल्याचे "एडीआर'च्या अहवालातून दिसले आहे. निवडणूक आखाड्यातील २६ महिला उमेदवार निरक्षर आहेत.

महिला उमेदवारांची संक्षिप्त माहिती...
पक्षनिहाय महिला उमेदवार
कॉंग्रेस : ५४
भाजप : ५३
बसप : २४
तृणमूल कॉंग्रेस : २३
माकप : १०
भाकप : ४
राष्ट्रवादी कॉंग्रेस : १
आप : १
अपक्ष : २२२

आरोपी उमेदवार
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी : १००
गंभीर स्वरूपाचे गुन्हे : ७८
दोषी ठरलेल्या : २
खुनाचे आरोप : ४
खुनाचा प्रयत्न : १६
भ्रूणहत्या : १४
प्रक्षोभक भाषण : ७

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
भाजप : १३
कॉंग्रेस : १०

करोडपती उमेदवार
२०१९मधील संख्या : २५५
२०१४मधील संख्या : २१९

पक्षनिहाय मालमत्ता
सप : ३९.८५ कोटी
भाजप : २२.०९ कोटी
कॉंग्रेस : १८.८४ कोटी
बसप : ३.०३ कोटी
आप : २.९२ कोटी
अपक्ष उमेदवार : १.६३ कोटी
तृणमूल कॉंग्रेस : २.६७ कोटी
माकप : १.३३ कोटी

श्रीमंत उमेदवार (कोटी रु.)
हेमामालिनी (भाजप) : २५०
डीए सत्यप्रभा (तेलुगू देशम पक्ष) : २२०
हरसिमरतकौर बादल (शिरोमणी अकाली दल) : २१७
काहीही नाही : ६

शैक्षणिक पार्श्‍वभूमी
निरक्षर : २६
नवसाक्षर : ३६

विविध वयोगट
२५ ते ५० वर्षे : ५३१
५१ ते ८०वर्षे : १८०
८० वर्षांहून जास्त : १
२५ वर्षांपेक्षा कमी : १

इतर ताज्या घडामोडी
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...