कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची फसवणूक
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी साडेचार हजार रुपयांची अनामत रक्‍कम घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आमगाव पाेलिसांनी तिघांना अटक केली असून दोघे फरार आहेत. या प्रकरणाचे जाळे वर्धा, चंद्रपूर तसेच लातूरपर्यंत असल्याची माहिती समोर आली असून कोट्यवधी रुपयांनी शेतकऱ्यांची यात फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. 

आमगाव तालुक्‍यातील सिसामा येथील सूरज कवडू वाढई यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार, मानसी कन्सल्टसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अनेक गावांमध्ये स्थानिक तरुणांना एजंट नेमले होते. त्यांच्या माध्यमातून ४५ दिवसांत कर्ज मंजूर करून देण्याचे आमीष दाखविण्यात आले. त्याकरिता शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये अनामत म्हणून वसूल केली गेली. मे २०१८ ते ८ फेब्रुवारी २०२९ या काळात कंपनीने ७३ शेतकऱ्यांकडून २ लाख ८० हजार ५०० रुपये घेतले. परंतु ४५ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही कुणालाही कर्ज मंजूर केले नाही. आमगाव व सालेकसा तालुक्‍यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गातील फसवणूक झालेले व्यक्‍ती आहेत.  आमगाव पोलिसांनी या प्रकरणी मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील विरेंद्र भाटकर (वय २८),  मिलेंद्र प्रेमलाल बागडे (वय ३८), भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी येथील वसंत राऊत (वय ४३) यांना अटक केली तर दोघे फरार आहेत. अटकेतील आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

एजंटची पण झाली फसवणूक कंपनीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. त्याआधारे एजंटची भरती करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. परंतु एजंटनी आपल्या ओळखीच्या व्यक्‍तींकडून अनामत रक्‍कम भरून घेतल्याने त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com