विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री वारीत ७६ लाखांचे उत्पन्न

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री वारीत ७६ लाखांचे उत्पन्न
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री वारीत ७६ लाखांचे उत्पन्न

सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री वारीमध्ये पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ७५ लाख ९५ हजार ९५८ रुपये इतके उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या यात्रेतील उत्पन्नाच्या तुलनेत मंदिर समितीला या वर्षी तीन लाख ९६ हजार २६८ रुपये इतके जादा उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.  याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी ढोले म्हणाले, श्री विठुरायाच्या पायावर १४ लाख ५ हजार ३०९ तर रुक्मिणीमातेच्या पायावर ३ लाख ६६ हजार ९१३ रुपये प्राप्त झाले. याशिवाय अन्नछत्र देणगी दोन लाख २७ हजार ४७, पावती स्वरूपातील देणगी १९ लाख ९३ हजार ३४२ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्रीद्वारे १६ लाख ७१ हजार आणि राजगिरा लाडू विक्रीतून एक लाख ६ हजार ५००, फोटो विक्री २७ हजार ५७५ रुपये, मंदिर समितीच्या विविध भक्तनिवासद्वारे ४ लाख ४९ हजार ११०, नित्यपूजा दोन लाख ६१ हजार, श्री विठ्ठल विधी उपचार ९२ हजार, आॅनलाइन देणगीद्वारे दोन लाख ८३ हजार ३५५ रुपये, चंदनउटी पूजेद्वारे तीन लाख ५ हजार आणि इतर अन्य स्वरूपात चार लाख ७ हजार ८१७ रुपये इतक्या रकमेचा समावेश होतो.  या वर्षी चैत्री वारीच्या काळात सुमारे ५ लाख ३३ हजार ९५२ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचीही माहितीही त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com