agriculture news in Marathi, 75 crore rupees credited in farmers account of agri equipment purchase, Maharashtra | Agrowon

अवजार खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ७५ कोटी जमा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरणाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ७५ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. 

पुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरणाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ७५ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. 

शेती अवजारे अनुदान वाटपात महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) व काही ठेकेदारांकडून गैरव्यवहार केला जात होता. घोटाळेबहाद्दरांना वठणीवर आणण्यासाठीच ‘डीबीटी’ धोरणाचे निकष अवजार अनुदानासाठी यंदा लावण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ४ कोटी ९८ लाख रुपये, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलबिया विकास योजनेतून २ कोटी ५३ लाख, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून २३ कोटी ९५ लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ४२ कोटी ७८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ‘डीबीटी’ने जमा करण्यात आले आहेत. 

‘डीबीटी’मुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम इतरत्र जाण्याचा किंवा ठेकेदाराला परस्पर रकमा जाण्याचा भाग बंद झाला आहे. एका शेतकऱ्याला कोणत्याही एकाच अवजारासाठी अनुदान दिले जात आहे. शेती अवजारांसाठी यंदा डीबीटीतून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना २४ कोटी ३७ लाख रुपये तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना १९ कोटी ७७ लाख रुपये वाटण्याची तयारी कृषी खात्याने केली आहे.

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना यंदा अवजारांपोटी १५३ कोटी रुपये वाटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा एकूण १९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. 

सरकारी अनुदानातून अवजारे खरेदी करण्यासाठी राज्यातून यंदा एक लाख २० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मागासवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य असूनही अनुदानासाठी कमी अर्ज आलेले आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या ९२०७ शेतकऱ्यांनी तर अनुसूचित जमातीच्या ५८१४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. पॉवरटिलरसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत, रोटाव्हेटसाठी ६३ हजार रुपयांपर्यंत तर भात लागवड यंत्रासाठी दोन लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे. 

‘डीबीटी’ तत्त्वावरील अनुदान वाटपांची वैशिष्ट्ये

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १९८ कोटी रुपये जमा करण्याचे यंदा नियोजन. 
  • ‘डीबीटी’ तत्त्वानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी १३१ कोटी रुपये कृषी खात्याच्या ताब्यात.
  • कृषी खात्याच्या ताब्यात असलेल्या निधींपैकी ११ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक     खात्यात ७५ कोटी २६ लाख रुपये जमा. 
  • आतापर्यंत अनुदानासाठी अर्ज केलेल्या १ लाख २० हजार शेतकऱ्यांपैकी ३० हजार शेतकऱ्यांना अनुदान मंजुरीचे पूर्वसंमतीपत्र दिले गेले.

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...