पुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान

पुणे  : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारित अवजारे, साहित्य पुरवठा करण्यात येतो. यावर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) धोरणानुसार कृषी अवजारे खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी सभापती सुजाता पवार यांनी केले आहे. 

२०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागाला वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ८ कोटी ८ लाख निधी उपलब्ध आहे. यातून शेतकऱ्यांना यावर्षी १३ प्रकारची अवजारे, साहित्यासाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ही अवजारे स्वत: खरेदी करायची असून, खरेदीच्या पावत्या जिल्हा परिषदेकडे सादर करायच्या आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

२०१८-१९ या वर्षातील थेट लाभ हस्तांतर धोरणानुसार जिल्ह्यातील एकूण ८६२९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७ कोटी ४३ लाख ७३ हजार रुपये अनुदान वर्ग केले. गतवर्षी ९० टक्के साहित्य खरेदी झाली. दुष्काळी स्थितीमुळे काही लाभार्थी शेतकऱ्यांकडे वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने साहित्य खरेदी पूर्ण होऊ शकलेली नसल्याचे पवार यांनी सांगितले. 

या वर्षीच्या योजनांमध्ये जिल्हा परिषद अपारंपरिक ऊर्जा स्रोत योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘सोलर वॉटर हीटर’साठी ५० टक्के अनुदान देणार आहे. 

शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणारी अवजारे 

  •     ३ एच.पी. ओपनवेल मोटार पंपसंच
  •     ५ एच.पी. ओपनवेल मोटार पंपसंच
  •     ७. ५ एच.पी. ओपनवेल मोटार पंपसंच
  •     ५ एच.पी. डिझेल इंजिन पंपसंच
  •     ७५ एमएम पीव्हीसी पाइप
  •     ९० एमएम पीव्हीसी पाइप
  •     ७५ एमएम एचडीपीई पाइप
  •     बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप
  •     एच.टी.पी. स्प्रेपंप ऑइल इंजिनसह
  •     प्लॅस्टिक क्रेटस
  •     प्लॅस्टिक ताडपत्री
  •     सरी रिजर ट्रॅक्टरचलित
  •     इलेक्ट्रॉनिक कडबाकुट्टी यंत्र मोटारीसह
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com