agriculture news in Marathi, 76 percent water stock in reservoirs, Maharashtra | Agrowon

देशातील जलाशयांमध्ये ७६ टक्के पाणीसाठा
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने येथील जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. परिणामी, देशातील एकूण पाणीसाठ्याचा आकडाही वाढला आहे. देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ होऊन ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयांमध्ये १२२.५१४ अब्ज घनमीटर पाणी आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. 

नवी दिल्ली ः मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने येथील जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. परिणामी, देशातील एकूण पाणीसाठ्याचा आकडाही वाढला आहे. देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ होऊन ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयांमध्ये १२२.५१४ अब्ज घनमीटर पाणी आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. 

सध्या देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये ७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या यात काळातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा १६.७ टक्के अधिक पाणीसाठा आहे; तर गेल्या १० वर्षांतील पाण्यासाठ्याच्या सरासरीच्या तुलनेत ५.३ टक्के पाणीसाठा आहे.
मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्याने येथील जलाशयांमध्ये जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. या चार राज्यांमध्ये ३४.४२ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या हा पाणीसाठा ८१ टक्के आहे. मागील वर्षी या चार राज्यांतील जलाशयांमधील पाणीसाठा याच काळात ६४ टक्के होता. सध्या पाणीसाठा १५ टक्क्यांनी जास्त आहे; तर मागील १० वर्षांतील पाणीसाठ्याची सरासरी ७४ टक्के होती. 

उत्तरेतील राज्यांमध्ये अधिक पाणीसाठा
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे; तसेच मागील दहा वर्षांच्या तुलनेत अधिक साठा होता; तर पूर्वेकडील राज्यांमधील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, करेळ आणि तमिळनाडू या राज्यांमधील जलाशयांमध्ये ३८.३७ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. एकूण जिवंत साठ्याच्या तुलनेत हा साठा ७४ टक्के आहे. मागील वर्षी या भागातील जिवंत पाणीसाठा ५० टक्के होता;  तर मागील १० वर्षांतील सरासरी ६७ टक्के आहे.

जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती

  • देशातील जलाशयांमध्ये १२२.५१४ अब्ज घनमीटर साठा
  • एकूण क्षमतेच्या ७६ टक्के पाणीसाठा
  • मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १६.७ टक्के अधिक पाणीसाठा
  • उत्तरेतील जलाशयांमध्ये ८१ टक्के पाणी शिल्लक
  • दक्षिणेतील राज्यांमध्ये ७४ टक्के पाणी शिल्लक
  • अनेक भागांत पावसामुळे वाढली पाणीपातळी
  • उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अधिक साठा

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...