agriculture news in Marathi, 764 crore fund for drip subsidy, Maharashtra | Agrowon

ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी यंदा, २०१७-१८ मध्ये तब्बल ७६४ कोटी उपलब्ध झाले आहेत. ठिबक योजनेच्या इतिहासात एवढा निधी प्रथमच मिळाला असून, आतापर्यंत २१६ कोटी रुपये वाटण्यात आले आहेत. 

सूक्ष्म सिंचन योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात केंद्र शासनाने नियमावली कठोर केली आहे. अर्थात, शेतकऱ्यांसाठी मात्र भरपूर निधी मंजूर करून देण्याची काळजीदेखील प्रथमच घेतली गेली आहे. पाच एकरपेक्षा जादा शेतजमीन असल्याचे कारण दाखवून शेतकऱ्याला दहा टक्के कमी ठिबक अनुदान दिले जात होते. ती अटदेखील यंदा केंद्र सरकारने यंदा रद्द केली आहे. 

पुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी यंदा, २०१७-१८ मध्ये तब्बल ७६४ कोटी उपलब्ध झाले आहेत. ठिबक योजनेच्या इतिहासात एवढा निधी प्रथमच मिळाला असून, आतापर्यंत २१६ कोटी रुपये वाटण्यात आले आहेत. 

सूक्ष्म सिंचन योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात केंद्र शासनाने नियमावली कठोर केली आहे. अर्थात, शेतकऱ्यांसाठी मात्र भरपूर निधी मंजूर करून देण्याची काळजीदेखील प्रथमच घेतली गेली आहे. पाच एकरपेक्षा जादा शेतजमीन असल्याचे कारण दाखवून शेतकऱ्याला दहा टक्के कमी ठिबक अनुदान दिले जात होते. ती अटदेखील यंदा केंद्र सरकारने यंदा रद्द केली आहे. 

"महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेतील स्वतःचा वाटा म्हणून ३८१ कोटी रुपयांचा निधी यंदा दिला आहे. राज्य शासनाने यात आपला वाटा म्हणून २४० कोटी रुपये टाकले आहेत. राज्य शासनाने याशिवाय ठिबकची स्वतंत्र एक योजना १०० टक्के अनुदानावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून १४३ कोटी रुपये ठिबककरीता मिळाले आहेत. त्यामुळे एकूण ७६४ कोटी रुपयांचा निधी प्रथमच ठिबक योजनेसाठी उपलब्ध झाला आहे. इतका निधी ठिबकसाठी यापूर्वी कधीही मंजूर झालेला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ठिबकसाठी मंजूर निधी भरपूर असला तरी वापराच्या प्रमाणात निधीचे वितरण होत असते. त्यामुळे आतापर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ७६४ कोटी रुपयांपैकी ३७७ कोटी मिळाले आहेत. उर्वरित ३८७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले जाणार आहेत. "मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपले तरी उर्वरित ३८७ कोटी रुपये परत (लॅप्स) जाणार नाहीत. हा निधी पुढील आर्थिक वर्षातदेखील वापरण्याची मुभा असल्यामुळे शेतकऱ्यांना ठिबकसाठी पुढील वर्षीदेखील अनुदानाची अडचण येणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दीड लाख शेतकऱ्यांना लवकरच अनुदान
राज्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना चालू वर्षात आतापर्यंत २१६ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. चार लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी ठिबक अनुदानासाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी २ लाख ५ हजार शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्वसंमती मिळाली आहे. अंदाजे दीड लाख शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवून बिलेदेखील सादर केली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत थेट बॅंक खात्यांत अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...