agriculture news in marathi, 772 villages of Parbhani district drought | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ७७२ गावे दुष्काळी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

परभणी : तिस-या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आणखीन तीन मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. नव्याने दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांमध्ये गंगाखेड तालुक्यातील एक आणि जिंतूर तालुक्यातील दोन मंडळातील एकूण ८० गावांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळाची संख्या ३५ पर्यंत, तर गावांची संख्या ७७२ झाली.

परभणी : तिस-या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आणखीन तीन मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. नव्याने दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांमध्ये गंगाखेड तालुक्यातील एक आणि जिंतूर तालुक्यातील दोन मंडळातील एकूण ८० गावांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळाची संख्या ३५ पर्यंत, तर गावांची संख्या ७७२ झाली.

यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरिप पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट आली. परंतु केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु जिंतूर, गंगाखेड, पूर्णा या तीन तालुक्यांमध्ये तो जाहीर करण्यात आला नव्हता.

जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या क्षेत्रीय पाहणी अहवालानंतर दुस-या टप्प्यामध्ये जिंतूर, बोरी, आडगांव, चारठाणा (सर्व ता.जिंतूर), महातपुरी, माखणी, राणीसावरगांव (सर्व ता.गंगाखेड), लिमला (ता.पूर्णा) या ८ मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यानंतर २०१८ च्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या, खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आलेल्या गावाबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सादर केला. तो विचारात घेऊन जिल्ह्यातील गंगाखेड महसूल मंडळातील २०, जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळातील ३०, बामणी मंडळातील ३० असे एकूण ८० गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला.

या ८० गावांमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणा-या जमिन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालु विज बिलात ३३.५ टक्के सवलत, शेतीपंपाचा विज पुरवठा खंडित न करणे, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफी आदी सवलती लागू होतील. आता पूर्णा तालुक्यातील पूर्णा, कात्नेश्वर, चुडावा, ताडकळस या चार मंडळातील ७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे बाकी आहे. 

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...