agriculture news in marathi, 78 cusecs water in Jalalgaon district; from Hatnur dam | Agrowon

हतनूर धरणातून ७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

जळगाव  : तापी नदीवरील मुक्ताईनगर व भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात मध्य प्रदेशातून पाण्याचा प्रवाह कायम असून, १० दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. या धरणातून ७८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

या धरणाचे सुवातीला दोन दरवाजे मागील आठवड्यात उघडण्यात आले होते. सोमवारी (ता. २५) सहा दरवाजे उघडले, तर मंगळवारी (ता. २६) पुन्हा दोन दरवाजे उघडे करण्यात आले. धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाच्या क्षेत्रात सुमारे ५ मिलिमीटर पाऊस मंगळवारी झाला आहे.

जळगाव  : तापी नदीवरील मुक्ताईनगर व भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात मध्य प्रदेशातून पाण्याचा प्रवाह कायम असून, १० दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. या धरणातून ७८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

या धरणाचे सुवातीला दोन दरवाजे मागील आठवड्यात उघडण्यात आले होते. सोमवारी (ता. २५) सहा दरवाजे उघडले, तर मंगळवारी (ता. २६) पुन्हा दोन दरवाजे उघडे करण्यात आले. धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाच्या क्षेत्रात सुमारे ५ मिलिमीटर पाऊस मंगळवारी झाला आहे.

मंगळवारी दुपारी मुक्ताईनगरसह जळगाव, पाचोरा, धरणगाव, चाळीसगाव, पारोळा, चोपडा, जामनेर, यावल, रावेर, जामनेर, भडगाव, अमळनेर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यात जळगावात बुधवारी सकाळी आठपर्यंत २२, धरणगावात १६, चोपड्यात आठ, यावलमध्ये १२,  मुक्ताईनगरात सहा, पाचोरा येथे १२, चाळीसगावात २२ , भडगावात १४, पारोळा येथे आठ, बोदवड येथे १४ आणि रावेरात आठ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली.

चाळीसगाव तालुक्‍यात चांगला पाऊस झाला असूून, मागील तीन दिवस सलग पाऊस झाला आहे. याचा लाभ खरीप पिकांना होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासंबंधीची कामे झालेल्या पारोळा, पाचोरा, चाळीसगाव भागात चांगला जलसंचय झाला आहे. या भागातील लहान मोठे असे सुमारे सात साठवण बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रावेरात मात्र हवा तसा पाऊस या आठवड्यात झालेला नाही. मागील आठवड्यात फक्त पाल, पाडले भागात पाऊस झाला होता.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...