agriculture news in marathi, | Agrowon

जनावरांतील गर्भाशय संसर्ग ः लक्षणे अन् उपाययोजना
डॉ. मयूर थुल
मंगळवार, 1 मे 2018

प्रसूतीनंतर उद्‌भवणारा गर्भाशय संसर्ग हा त्या जनावराची रोगप्रतिकारक्षमता, जिवाणू प्रजाती व जिवाणूंची संख्या यावर अवलंबून असतो. भारतातील गायींमध्ये हे प्रमाण १६.५ टक्के असून, त्यामुळे त्यांच्या दुग्धोत्पादनात १५ टक्के एवढी घट आढळून येते तर म्हशींमध्ये हेच प्रमाण २१.६ टक्के व दुग्धोत्पादनातील घट ही १२ टक्के एवढी दिसून येते.
 
प्रसूतीनंतर जनावराच्या शरीराची झीज व शरीरात होणारे बदल हे तीव्र स्वरूपाचे असतात. प्रसूतीनंतर ९० टक्के जनावरांच्या गर्भाशयात जिवाणू संक्रमित होण्याची शक्‍यता असते, तर काही निरोगी जनावरे यावर सहजपणे मात करतात.

प्रसूतीनंतर उद्‌भवणारा गर्भाशय संसर्ग हा त्या जनावराची रोगप्रतिकारक्षमता, जिवाणू प्रजाती व जिवाणूंची संख्या यावर अवलंबून असतो. भारतातील गायींमध्ये हे प्रमाण १६.५ टक्के असून, त्यामुळे त्यांच्या दुग्धोत्पादनात १५ टक्के एवढी घट आढळून येते तर म्हशींमध्ये हेच प्रमाण २१.६ टक्के व दुग्धोत्पादनातील घट ही १२ टक्के एवढी दिसून येते.
 
प्रसूतीनंतर जनावराच्या शरीराची झीज व शरीरात होणारे बदल हे तीव्र स्वरूपाचे असतात. प्रसूतीनंतर ९० टक्के जनावरांच्या गर्भाशयात जिवाणू संक्रमित होण्याची शक्‍यता असते, तर काही निरोगी जनावरे यावर सहजपणे मात करतात.

कारणे
गर्भाशय संसर्गासाठी अनेक घटक जबाबदार असल्यामुळे, संसर्गासाठी नेमके जबाबदार घटक ओळखणे कठीण ठरते. परंतु प्रामुख्याने असंतुलित आहार व सभोवतालचे वातावरण या बाबी गर्भाशय संसर्गासाठी जबाबदार असल्याचे दिसून येते.

आहार

  • प्रसूतीचा ३ महिन्यांचा कालावधी हा अत्यंत आवश्‍यक असतो. या कालावधीमध्ये शरीररक्षण आणि गर्भाची पुरेपूर वाढ होण्याकरिता लागणाऱ्या ऊर्जेची गरज वाढते.
  • प्रसूतीवेळी जनावर एका विशिष्ट तणावाखाली असल्यामुळे जनावर गरजेपुरता आहार घेऊ शकत नाही. परिणामी शरीरात अन्नघटकांची कमतरता निर्माण होते.
  • प्रसूतिपूर्व ३-६ आठवड्यांत गर्भाची वाढ होण्यासाठी लागणारी ऊर्जेची व प्रथिनांची आवश्‍यकता वाढते. तसेच ही गरज पूर्ण न झाल्यास उत्पादनाशी नगडीत आजार जसे की दुग्धज्वर, किटोसिस इ. होण्याची शक्‍यता बळावते अाणि प्रजनन क्षमतेमध्ये घट होते.
  • या कालावधीमध्ये कॅल्शिअम आणि सेलेनिअम या खनिजांची तसेच अ आणि ई या जीवनसत्त्वांची योग्य मात्रा असणे आवश्‍यक असते.
  • प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनाकरिता कॅल्शिअम हे अत्यंत आवश्‍यक असून, रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यास जार अडकणे तसेच गर्भाशयाचे विविध संसर्ग जडतात.

सभोवतालचे वातावरण
प्रसूतीवेळी किंवा त्यानंतरही काही दिवसांपर्यंत गर्भाशय मुख हे उघडे राहते. परिणामतः आजूबाजूच्या वातावरणात सहजपणे आढळणारे जिवाणू, विषाणू, धूलिकण गोठ्यातील घाण, जनावरांचे मलमूत्र इत्यादीशी सहज संपर्क होतो. हे घटक जिवाणूंचे संक्रमण होण्यास प्रामुख्याने जबाबदार असतात. अगोदरच प्रसूतीच्या कठीण प्रक्रियेमुळे गर्भाशयावर ताण आल्यामुळे जनावर संसर्गासाठी बळी पडण्यास अनुकूल ठरते.

लक्षणे
दृष्टीने सहजपणे आढळून येणारी लक्षणे ः १) मंदपणा २) ताप ३) दुग्धोत्पादनात घट ४) भूक मंदावणे ५) प्रसूतीनंतर योनीमार्गात लाल व करड्या रंगांचा दुर्गंधी स्राव
दृष्टिक्षम नसणारी लक्षणे ः वरील प्रकारचे कोणतेही लक्षण न दिसता, गर्भाशय पेशींची तपासणी केल्यास न्यूट्रोफिलचे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त आढळते.

निदान

  • प्रसूतिपूर्व रक्ताची चाचणी करून प्रसूतीनंतर होणाऱ्या गर्भाशयाच्या संसंर्गाची शक्‍यता पडताळता येते. तसेच जनावराच्या वर्तणुकीवरूनही गर्भाशय संसर्गाची लक्षणे ओळखण्यास मदत होते. अशा गाई कळपापासून विभक्त होऊन, एकटे राहणे पसंत करतात.
  • सामान्यतः ज्या जनावरांना संसर्ग होतो त्यांची प्रसूतीच्या २ आठवड्यांपूर्वीच्या काळात आहार घेण्याची क्षमता खूपच खालावते. परिणामतः आहारातून मिळणारे अन्नघटकाचे प्रमाण कमी होऊन शरीरातील किटोनचे प्रमाण वाढते, जे की न्यूट्रोफिल कार्यप्रणालीमध्ये अडथळा आणून जनावरांना संसर्ग जडण्यास अधिक अनुकूल बनवते.

प्रतिबंधात्मक व्यवस्थापन उपाय
१) जनावरांची प्रसूतिपूर्व काळातील आहाराची व आरोग्याची देखभाल
गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा ताण कमीत कमी करण्यासाठी जनावरांना भाकड काळामध्ये पोषक व संतुलित आहाराची गरज भागवणे अत्यंत गरजेचे असते. उदा. प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे. निरोगी गर्भाशयासाठी प्रसूतिपूर्व काळात जनावराचे वजन घटू न देणे तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे योग्य संतुलन राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते. रोजच्या आहारामध्ये प्रतिदिन ३० ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण देणे आवश्‍यक असते. प्रसूती काळातील बरेच संसर्ग हे बहुधा स्थूलपणाशी निगडित असतात. परिणामी गर्भाशयातील स्नायूंची आकुंचन प्रसरणाची प्रक्रिया मंदावते, थकवा लवकर येतो, तसेच नवजात वासराचा जन्म कठीण होतो म्हणून जनावरे लठ्ठ होण्यापासून टाळावेत. परंतु खूप अशक्‍त जनावरेही विविध रोगांना लवकर बळी पडतात; म्हणून प्रसूतीच्या काळात जनावराची शारीरिक बांधणी संतुलित असणे आवश्‍यक ठरते.

२) प्रसूतीनंतरची जनावराची देखभाल

  • प्रसूतीनंतरच्या रोगांना नियंत्रित करण्यासाठी जनावरांना प्रसूतीनंतर नियमित देखभालीची गरज असते. बऱ्याच वेळा लक्षणे दृष्टीस आल्यानंतर संसर्ग झाल्याचे समजते. उपचारावरील खर्च वाढून जनावराला निरोगी होण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे संसर्गाचे प्राथमिक स्थितीत निदान होण्यासाठी प्रसूतीनंतर जनावराचे दररोज कमीत कमी दहा दिवस शरीर तापमान घेऊन वारंवार निरीक्षण करणे गरजेचे ठरते.
  • जार अडकणे आणि कष्टप्रद प्रसूती हे रोग प्रामुख्याने गर्भाशयाच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरतात. कष्टप्रद प्रसूती हा प्रसूतीमध्ये होणारा सामान्य रोग आहे. अनेकदा अशी परिस्थिती अकुशल व्यक्तीकडून अयोग्य पद्धतीने हाताळल्यामुळे अधिक किचकट होते. अशा परिस्थितीत कुशल पशुवैद्यकाकडून प्रसूती करणे अनिवार्य असते. प्रसूतीवेळच्या या अडचणी टाळण्यासाठी प्रसूतीच्या वेळी जनावराची पुरेपूर वाढ म्हणजेच संपूर्ण वजनाच्या ८५ टक्के वाढ असणे आवश्‍यक असते.
  • दुधाळ जनावरांचे प्रजनन आरोग्य संतुलित ठेवण्याकरिता व चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांना खनिजे, जीवनसत्त्वयुक्त संतुलित आहार पुरविणे व सभोवतालचे वातावरण निरोगी, स्वच्छ आणि आरामदायी राखणे महत्त्वाचे ठरते.

संपर्क ः डॉ. मयूर थुल, ८९५०८४३८२६
(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, करनाल, हरयाना)

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...