agriculture news in marathi, 80 rupees per hundred banana leaf, Maharashtra | Agrowon

केळीच्या पानांना शेकडा ८० रुपयांवर दर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

जुनारी बागा संपत आलेल्या असतानाच शेतकऱ्यांनी बागांमधील फुटवे, पाने कापून बागा स्वच्छ केल्या आहेत. तसेच काहींनी तणनाशक फवारल्याने काही ठिकाणी फुटव्यांची फारशी वाढ झालेली नाही. यामुळे केळीची पाने व फुटवे कमी प्रमाणात मिळतात. 
- रमेश बडगुजर, केळी पाने, फुटवे विक्रेता
 

जळगाव ः सणासुदीच्या दिवसांमध्ये केळीच्या पानांसह फुटव्यांना मोठी मागणी आहे. परंतु, यंदा जुनारी केळी बागा संपत आल्याने फुटव्यांसह पानांची उपलब्धता कमी आहे. ऐन मागणीच्या वेळेस तुटवडा असल्याने पुरवठादारांना बऱ्यापैकी दर मिळत आहेत. गुरुवारी (ता.१३) पानांना प्रतिशेकडा ८० रुपयांपर्यंत, तर फुटव्यांना प्रतिबंडल (१० फुटवे) २०० रुपये दर मिळाला. शहरात किरकोळ व्यावसायिकांनी आणखी अधिक दरात त्यांची विक्री केली. 

रावेर, यावल, चोपडा, भुसावळ या भागात केळीची पाने व फुटवे सहज उपलब्ध होत आहेत. केळी उत्पादक गावांमधील मजूर व इतर मंडळी केळी पाने व फुटवे शेतांमधून काढून ती बाजारात विक्रीसाठी आणतात. जुनारी बागा रावेर, यावल, चोपडा भागात आहेत. जळगाव, पाचोरा, जामनेर भागात त्या फारशा नाहीत. कांदेबागमध्ये फुटवे, पाने उपलब्ध होत नाहीत. या बागा कापणीवर नुकत्याच आलेल्या असल्याने शेतकरी त्यात पाने व फुटवे कापू देत नाहीत. कारण झाडांचा बुंधा मजबूत होत नाही. घड हवे तसे पक्व होत नाहीत. बागेत उष्णता वाढते. यामुळे पाने व फुटव्यांचा पुरवठा कमी आहे. 

पारोळा, अमळनेर, चाळीसगाव भागात ते उपलब्धच नाहीत. यामुळे तेथे अधिकचे दर आहेत. गणपती प्रतिष्ठापनेसाठी फुटव्यांना मागणी होती. शुक्रवारी (ता.१४) ऋषिपंचमी निमित्तही पाने व फुटव्यांची मोठी मागणी दिसून आली. जळगावात शुक्रवारी घाणेकर चौक, वल्लभदास वालजी व्यापारी संकुल, सुभाष चौक व इतर उपनगरांमध्ये जवळपास पाने व फुटव्यांची विक्री सुरू होती. जळगावात यावल तालुक्‍यातील डांभुर्णी, चोपडामधील धानोरा, देवगाव, पुनगाव, मितावली भागातून यासह जळगाव तालुक्‍यातील विदगाव, आमोदे बुद्रुक, नांद्रा बुद्रुक, खेडी खुर्द भागातून केळी पाने व फुटव्यांचा पुरवठा झाला. 

 

इतर अॅग्रो विशेष
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...