मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीने ८१ जणांचा मृत्यू

 नैसर्गिक आपत्ती
नैसर्गिक आपत्ती

औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा आजवरच्या पावसाळ्यात तब्बल ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू नांदेड जिल्ह्यात झाले असून, नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या प्रकरणांपैकी ५७ प्रकरणांत शासनाची मदत देण्यात आली आहे. २४ प्रकरणांमध्ये अजूनही मृतकांच्या वारसांना मदत मिळाली नाही.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांबरोबरच जीवितहानीचेही प्रमाण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदा मराठवाड्यातील ८१ व्यक्‍तींना नैसर्गिक आपत्तीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या २५, दरड कोसळून मृत्यू आलेल्या एका, वीज पडून मृत्यू आलेल्या ५१ तर इतर आपत्तीने मृत्यू ओढावलेल्या ४ मृत्यू प्रकरणांचा समावेश आहे.

यापैकी ५७ मृत्यू प्रकरणात शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मदतीनुसार २ कोटी २८ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आल्पाची २४ प्रकरण अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये बीड व परभणी जिल्ह्यांतील सर्वाधिक प्रत्येकी सात प्रकरणांचा समावेश असून औरंगाबाद जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यांतील दोन, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एक व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन व्यक्‍तींच्या मृत्यू प्रकरणांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आलेल्या व्यक्‍तींच्या एकूण दहा प्रकरणांपैकी तब्बल सात प्रकरण मदतीसाठी प्रलंबीत आहेत.

दरम्यान, मराठवाड्यात यंदा एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १०२ पक्‍क्‍या घरांची पडझड झाली. त्यापैकी ९७ घरांच्या पडझडीची प्रकरणं नुकसानभरपाईसाठी पात्र ठरली आहेत. या घरांच्या नुकसानीप्रकरणी शासनाकडून ५ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली आहे.

१५२ दुधाळ जणावरांचाही मृत्यू मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीने १५२ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२० जनावरांच्या मृत्यू प्रकरणात शासनाकडून ३५ लाख ७ हजारांची मदत देण्यात आली आहे. तसेच १७९ लहान दुधाळ जनावरांच्या मृत्यूप्रकरणापैकी १२४ प्रकरणांत १५ लाख  ३ हजारांची मदत करण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या जणावरांच्या १३२ मृत्यू प्रकरणांपैकी १०२ जनावरांच्या मृत्यूप्रकरणी शासनाकडून २५ लाख २५ हजारांची मदत शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांच्या १६ मृत्यू प्रकरणांपैकी १४ प्रकरणात नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com