agriculture news in Marathi, 81 sugar factories started sugarcane crushing in state, Maharashtra | Agrowon

राज्यात ८१ कारखान्यांची धुराडी पेटली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात यंदा भरपूर ऊस असल्यामुळे १४० साखर कारखान्यांमध्ये गाळपाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८१ कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत आठ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 

पुणे : राज्यात यंदा भरपूर ऊस असल्यामुळे १४० साखर कारखान्यांमध्ये गाळपाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८१ कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत आठ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांचे ऊस वेळेत गाळपाला घेण्यासाठी नगरसहित सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने आघाडीवर आहेत. कोल्हापूर भागात डी. वाय. पाटील कारखान्याने २१ हजार टन तर ‘गडहिंग्लज’ने १४ हजार आणि छत्रपती राजाराम कारखान्याने १२ हजार टन गाळप केले आहे. सांगली भागात दहा कारखाने सुरू झाले असून ‘हुतात्मा अहिर’मधून २७ हजार टन तर ‘श्री श्री शुगर’ने २० हजार टनांचे गाळप केले.

पुणे भागात ३४ हजार टन ऊस गाळून ‘विघ्नहर’ने आघाडी घेतली आहे. ‘सोमेश्वर’ने २५ हजार, ‘संत तुकाराम’मध्ये १५ हजार, ‘भीमाशंकर’मध्ये २१ हजार, तर ‘नीरा-भीमा’ने २३ हजार टन गाळप केले आहे. 

सोलापूर भागात आघाडीच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ७० हजार टन ऊस गाळला आहे. नगरच्या साखर उद्योगातील भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने ३६ हजार टन, तर ‘कोपरगाव’ने १४ हजार, ‘अशोक’ने पाच हजार, ‘गंगामाई’ने ३२ हजार, तर ‘संजीवनी’ने आतापर्यंत १४ हजार टन गाळप केले आहे. 

राज्यात गाळप परवाने घेण्यासाठी १९१ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ८१ कारखान्यांमधून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावणेआठ लाख टन गाळप झाले आहे. सव्वातीन लाख क्विंटल ताजी साखर तयार झाल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, प्रत्येक कारखान्यात किती साखर तयार झाली याची माहिती अजून तयार झालेली नाही.

राज्यात अजून २६ कारखान्यांना लवकरच परवाना मिळणार आहे. मात्र या कारखान्यांनी सरकारची देणी दिलेली नाहीत. चार कारखान्यांनी अर्धवट माहिती पाठविल्यामुळे त्यांनाही गाळप परवाना मिळालेला नाही. शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या २१ साखर कारखान्यांना परवाना न देण्याचा निर्णय राज्य शासनाने तूर्त कायम ठेवला आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...