agriculture news in Marathi, 82 crore rupees soybean subsidy transfer to farmers account, Maharashtra | Agrowon

सोयाबीन अनुदानापोटी ८२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांत वर्ग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे ः साेयाबीनच्या काेसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील २ लाख ६९ हजार ८२४ शेतकऱ्यांना ८२ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केल्याची माहिती पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिली. सर्वाधिक लातूर जिल्ह्यात १७ काेटी रुपये अनुदान वाटण्यात आले आहे.

पुणे ः साेयाबीनच्या काेसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील २ लाख ६९ हजार ८२४ शेतकऱ्यांना ८२ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केल्याची माहिती पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिली. सर्वाधिक लातूर जिल्ह्यात १७ काेटी रुपये अनुदान वाटण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या (२०१६-१७) खरीप हंगामात साेयाबीनच्या क्षेत्रात माेठी वाढ झाली हाेती. बाजारातील आवक वाढल्याने दरात माेठी घसरण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान हाेऊ नये म्हणून २५ क्विंटलपर्यंत आणि जास्तीत जास्त ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑक्‍टोबरमध्ये घेतला होता.

या निर्णयानुसार ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने १०८ कोटी ६४ लाख २९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी ८२ कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात सोयाबीन खरेदीची सर्वाधिक १५९ केंद्रे होती, उडदासाठी ११६, तर मूग खरेदीसाठी १११ केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांवर उडदाची २ लाख ५३ हजार क्विंटल, मुगाची ४१ हजार क्विंटल आणि सोयाबीनची २ लाख २३ हजार क्विंटल खरेदी झाल्याची माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली.

जिल्हानिहाय देण्यात आलेली भरपाई (रुपयांमध्ये)
पुणे ः ८.१३ लाख, सोलापूर ः २.६९ लाख, सांगली ः ५ लाख, नाशिक ः ८.६७ लाख, नगर ः ९१.९८ लाख, जळगाव ः ६ लाख, नंदुरबार ः १९.८९  लाख, औरंगाबाद ः ३.९२  लाख, जालना ः ३.५३  कोटी, परभणी ः ४.३१ कोटी, हिंगोली ः १ कोटी, लातूर ः १७ कोटी, बीड ः ६७ लाख, उस्मानाबाद ः ४९ लाख, नांदेड ः २.८४ कोटी, अमरावती ः १२.१५ कोटी, अकोला ः ७ कोटी, वाशीम ः १२ कोटी, बुलडाणा ः ८ कोटी, यवतमाळ ः ४ कोटी, नागपूर ः १.२५ कोटी, वर्धा ः ४.५४ कोटी, चंद्रपूर ः ६८ लाख, धुळे ः ६ लाख, भंडारा ः १५ हजार

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...