agriculture news in Marathi, is 82 percent farmers have bogus seed in Nashik Division, Maharashtra | Agrowon

नाशिक विभागातील ८२ टक्के शेतकऱ्यांकडील बियाणे बनावट?
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नाशिक : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नाशिक विभागातील ३ लाख २७ हजार १९२ शेतकऱ्यांच्या तब्बल ३ लाख २४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक पोखरले गेले आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ३० हजार रुपये, तर क्षेत्राकरिता ३७ हजार रुपये प्रतिहेक्‍टर याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी अवघ्या १८ टक्के शेतकऱ्यांकडूनच कपाशीचे बियाणे खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे उर्वरित कपाशीचे बियाणे बनावट कंपनीचे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

नाशिक : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नाशिक विभागातील ३ लाख २७ हजार १९२ शेतकऱ्यांच्या तब्बल ३ लाख २४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक पोखरले गेले आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ३० हजार रुपये, तर क्षेत्राकरिता ३७ हजार रुपये प्रतिहेक्‍टर याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी अवघ्या १८ टक्के शेतकऱ्यांकडूनच कपाशीचे बियाणे खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे उर्वरित कपाशीचे बियाणे बनावट कंपनीचे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

नाशिक विभागासह राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा प्रश्न विधानसभेतही गाजला होता. बोंड अळीच्या समस्येने नाशिक विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या सर्वच जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विभागात सर्वांत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जळगाव जिल्ह्यात असून, त्याखालोखाल धुळे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नाशिक विभागात तब्बल ३ लाख २४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक बोंड अळीने पोखरून फस्त केल्याचा अंतिम नुकसानभरपाईबाबतचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठवला आहे.

नाशिक जिल्ह्यातही ११ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या ८ हजार ११९ हेक्टरवरील कपाशीचे पीक बोंड अळीने पोखरले आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीने विभागातील २ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापूस पिकाची पाहणी केली आहे.

खरेदी पावत्याच नाही
बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी विभागातील ३ लाख २७ हजार १९२ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५० हजार ९५८ शेतकऱ्यांनीच आपल्या प्रस्तावासोबत कपाशीचे बियाणे खरेदी केल्याची मूळ पावती कृषी विभागाकडे सादर केली आहे. हे प्रमाण अवघे १८ टक्के इतकेच आहे. त्यामुळे उर्वरित तब्बल ८२ टक्के शेतकऱ्यांकडील बियाणे अनधिकृत कंपन्यांचे असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी गुणवत्तेचे कपाशी बियाणे बाजारात सर्रास विक्री झाले असण्याची शक्यता आहे. अधिकृत बियाणे खरेदी केल्याची पावतीधारक शेतकऱ्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात अवघी १९, धुळ्यात २२, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १५ टक्के इतकीच आहे.

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...