agriculture news in Marathi, 83 village on tanker in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील ८३ गावांची तहान टॅंकरवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसताहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातही टंचाईची झळ बसणे सुरू झाली असून नांदेड जिल्ह्यातील काही गावांनाही टंचाई सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. औरंगाबाद व जालना मिळून ८३ गावांची तहान टॅंकरवर भागविण्याची वेळ आली आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसताहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातही टंचाईची झळ बसणे सुरू झाली असून नांदेड जिल्ह्यातील काही गावांनाही टंचाई सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. औरंगाबाद व जालना मिळून ८३ गावांची तहान टॅंकरवर भागविण्याची वेळ आली आहे. 

गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यान्हात ४८ गावांत बसलेली पाणीटंचाईची झळ बसली होती. यंदा फेब्रुवारीच्या सुरवातीलाच ७८ गावांपर्यंत पोचलेली टंचाईग्रस्त गावांची संख्या टंचाईची तीव्रता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. गतवर्षी वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, खुल्ताबाद आदी गावांना टंचाईची तिव्रता जाणवत होती. यंदा औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, खुल्ताबाद आदी तालुक्‍यांतील गावांमधील गावांना टंचाईची झळ बसते आहे. त्यामध्ये गंगापूर तालुक्‍याला टंचाईची सर्वाधिक झळ बसते आहे. गंगापूर तालुक्‍यातील ४२ गावे पाणीटंचाईचा सामना करीत असून फुलंब्री तालुक्‍यातील २० गावांनाही टंचाईची झळ बसते आहे. 

औरंगाबाद तालुक्‍यातील ३, वैजापूर तालुक्‍यातील ४, खुल्ताबाद तालुक्‍यातील ४, कन्नड तालुक्‍यातील २, सिल्लोड तालुक्‍यातील ३ गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील ३ व जाफ्राबाद तालुक्‍यातील २ मिळून पाच गावातील ६८८९ लोकांची तहान टॅंकरवर भागविण्याची वेळ आली आहे. गत पावसाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात विविध भागात पावसाचा प्रदीर्घ खंड पडला होता. सोबतच परतीच्या पावसाची हजेरीही काही भागातच बरी होती. नांदेड जिल्ह्यातही काही गावांना टंचाईची झळ बसणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

९६ टॅंकर भागवताहेत तहान
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी ९६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी ८९ तर जालना जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठीच्या ७ टॅंकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधीक ४५ टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू असून फुलंब्री तालुक्‍यात २८ टॅंकर लोकांची तहान भागविण्यासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

११६ विहिरींचे अधिग्रहण
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी आजवर ११६ विहिरींचे अधिग्रहनण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १११ व जालना जिल्ह्यातील ५ विहिरींचा यामध्ये समावेश आहे. फुलंब्री तालुक्‍यात सर्वाधिक ४०, गंगापूर व कन्नड तालुक्‍यांतील प्रत्येकी २२, सिल्लोड तालुक्‍यातील १०, वैजापूर व खुल्ताबाद तालुक्‍यातील प्रत्येकी ७ तर औरंगाबाद तालुक्‍यातील ३ विहिरींचा यामध्ये समावेश आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्‍यातील ३ व जाफ्राबाद तालुक्‍यात २ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...