agriculture news in Marathi, 863 e-pos machine distributed in pune district, Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ८६३ ‘पॉस’ मशिनचे वाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे ः शासनाने एक नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री ‘पॉस’ मशिनद्वारे करणे बंधनकारक केले आहे. शुक्रवार (ता.३)अखेर जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ८६३ ‘पॉस’ मशिनचे वाटप करण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यात १३१ ‘पॉस’ मशिनचा तुटवडा आहे. त्यामुळे विक्रेत्यांना हे मशिन लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे. 

पुणे ः शासनाने एक नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री ‘पॉस’ मशिनद्वारे करणे बंधनकारक केले आहे. शुक्रवार (ता.३)अखेर जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ८६३ ‘पॉस’ मशिनचे वाटप करण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यात १३१ ‘पॉस’ मशिनचा तुटवडा आहे. त्यामुळे विक्रेत्यांना हे मशिन लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे. 

शुक्रवार (ता.३)अखेर पुणे जिल्ह्यमाध्ये ८६३ मान्यताप्राप्त परवानाधारक खत विक्रेत्यांना ‘पॉस’ मशिनचे वितरण करण्यात आले. त्याद्वारेच शेतकऱ्यांना अनुदानित खताची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. ‘पॉस’ मशिनसंदर्भातील अडचणी सोडविण्याकरिता मशिन पुरवठादार कंपन्यांना जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी दिले. 

सध्या ज्या खत विक्रेत्यांकडे ‘पॉस’ मशीन नाहीत त्यांना खत विक्री करता येणार नाही. कृषी विभागाद्वारे मशीनमध्ये खत विक्रीसाठी उपलब्ध साठा भरण्यात आला असून त्या विक्रीनुसार संबंधित कंपनीला सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे अनुदानित खत हे फक्त ‘पॉस’ मशिनधारकांनाच पुरवठा होईल. ‘पॉस’ मशिनची एनआयसीला जोडणी करण्यात आली असून एका क्लिकद्वारे संपूर्ण माहिती संगणकावर उपलब्ध झाली असून त्याद्वारे खत विक्री केंद्र शासनाने सनियंत्रित केली आहे.

कंपन्यांना विक्री आधारे अनुदान मिळणार आहे. मागणी करण्यात आलेल्या दुकानदाराचे mFMS वरील नोंदणी तपासण्यात येऊन कंपनीकडे पॉस मशीनचे पुरवठयाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय पुरवठा झालेल्या ‘पॉस’ मशिनची स्थिती 
(कंसात: आवश्यक मशीन) 

आंबेगाव ६७ (१५), बारामती ८९ (०), भोर ३० (८), दौंड ११७ (०), हवेली ७८ (०), इंदापूर ९५ (४८), जुन्नर १०७ (४२), खेड ६४ (०), मावळ १८ (०), मुळशी १५ (३), पुरंदर ५८ (७), शिरुर १२३ (५), वेल्हा २ (३), एकूण ८६३ (१३१)

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...