agriculture news in marathi, 88 farmer suicides in Nashik District, Nashik | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ८८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन
ज्ञानेश उगले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक : नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी ८८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. आत्महत्याग्रस्तांमध्ये ५० टक्के युवा शेतकरी आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. 

नाशिक : नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी ८८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. आत्महत्याग्रस्तांमध्ये ५० टक्के युवा शेतकरी आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. 

गत तीन ते चार वर्षांपासून अस्मानी संकट, तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळलेला जिल्ह्यातील शेतकरी सरतेशेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत वाढ होताना दिसून येत आहे. गतवर्षी ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेे. वाढलेली ही आकडेवारी राजकीय नेत्यांसह जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.

जिल्ह्यात यंदा मालेगावमध्ये सर्वाधिक १४ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास संपविला आहे. त्याखालोखाल निफाड, बागलाण व नांदगाव तालुक्यात प्रत्येकी ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. एकीकडे निफाडसारख्या सधन तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असताना पेठ आणि इगतपुरी तालुक्यात मात्र आत्महत्येची आकडेवारी शून्य आहे.

सुरगाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गतवर्षी प्रशासनाने विविध तालुक्यांमध्ये गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी समुपदेशन कॅम्प घेतले होते. या कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतानाच त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, यंदा असे कोणतेही कॅम्प आयोजित केल्याचे पाहावयास मिळत नाही.

दुसरीकडे सुमारे तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतींची मदत घेण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, ही घोषणादेखील हवेतच विरली आहे. शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख बघता आता तरी त्या रोखण्यासाठी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...