agriculture news in Marathi, 88,890 tonne grapes export to europe from State, Maharashtra | Agrowon

राज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात
ज्ञानेश उगले
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नाशिक : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत. 

नाशिक : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत. 

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात द्राक्षांचा तुटवडा जाणवत असतांना देशांतर्गत व जागतिक बाजारातून मागणी वाढली. देशांतर्गत बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ५५ व सरासरी ४५ रुपये दर मिळाला. निर्यातक्षम द्राक्षांना या वेळी किलोला ५० ते ८० व सरासरी ६५ रुपये दर मिळाले. नाशिक, नगर व सांगली जिल्ह्यातील काही मोजक्‍याच बागा शिल्लक आहेत.

राज्यातील बहुतांश भागात द्राक्ष हंगाम आटोपला आहे. या हंगामात देशांतर्गत, तसेच निर्यातीच्या बाजारातील आवक व दर स्थिर राहीले. बहुतांश भागात उत्पादन कमी निघाल्याने त्याचा फटकाही बसला आहे. भारतातील महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून प्रामुख्याने निर्यात होते. महाराष्ट्रातून ८८,८९० टन तर कर्नाटकमधून अवघी ९२ टन द्राक्ष निर्यात युरोपात झाली. युरोपातील नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, बेल्जियम, नॉर्वे, लॅटविया, फ्रान्स, लिथुअानिया, इटली, स्वित्झर्लंड, स्पेन, आयर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रीया, झेक गणराज्य, ग्रीस या देशात निर्यात झाली.  

जिल्हानिहाय द्राक्ष निर्यात (टनांमध्ये)

जिल्हा     द्राक्ष निर्यात
नाशिक ७७,५४२
सांगली ५,७८६
सातारा २,७२९
लातूर ६२३
पुणे ५७८
उस्मानाबाद ५०८
नगर ४९९
सोलापूर ७०
बीड २६
एकूण ८८,८९०

 
      
    
    
    
 

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...