agriculture news in Marathi, 89 percent effect of bowlworm on cotton, Maharashtra | Agrowon

अमरावतीत बोंड अळीचा ८९ टक्‍के कपाशीला फटका
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

अमरावती ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे.

अमरावती ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे.

 या वर्षीच्या हंगामात दोन लाख २२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. मात्र ऑक्‍टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.८४ टक्‍के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार हेक्‍टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी ६८०० रुपयांप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुसार सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले होते. त्यानुसार सर्व्हेक्षण पूर्ण करून संयुक्‍त स्वाक्षरी अहवाल प्रशासनाला सादर  करण्यात आला. 

तालुकानिहाय नुकसानभरपाई (कोटींत)
भातकुली ः ५.५०, अमरावती ः ७.५५, चांदूर रेल्वे ः ६.१८, नांदगाव खंडेश्‍वर ः ७.८६, मोर्शी ः १९.२२, वरुड ः २७.९४, चांदूर बाजार ः १५.३४, तिवसा ः १२.६३, अचलपूर ः १८.७१, अंजनगावसूर्जी ः १४.९१, दर्यापूर ः १६.९७, धारणी ः ६.७७, चिखलदरा ः १ कोटी.

इतर बातम्या
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...