agriculture news in Marathi, 90 percent work had done in jalgaon district, Maharashtra | Agrowon

जळगावमध्ये ई-पॉसचे ९० टक्के काम पूर्ण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

जळगाव ः जिल्ह्यात खतांची विक्री ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनने करण्यास सुरवात झाली; पण अनेक ठिकाणी आधार क्रमांक लिंक न होणे, सर्व्हर डाउन अशा अडचणी आल्या. त्यातच खत विक्रेते बंदच्या तयारीत असल्याने अनेक ठिकाणचे वस्तुनिष्ठ अहवाल बुधवारी (ता. १) मिळू शकले नाही; परंतु जिल्ह्यात ई-पॉसचे काम ९० टक्के झाले असून, त्याचे कौतुक राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  
    

जळगाव ः जिल्ह्यात खतांची विक्री ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनने करण्यास सुरवात झाली; पण अनेक ठिकाणी आधार क्रमांक लिंक न होणे, सर्व्हर डाउन अशा अडचणी आल्या. त्यातच खत विक्रेते बंदच्या तयारीत असल्याने अनेक ठिकाणचे वस्तुनिष्ठ अहवाल बुधवारी (ता. १) मिळू शकले नाही; परंतु जिल्ह्यात ई-पॉसचे काम ९० टक्के झाले असून, त्याचे कौतुक राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  
    
ई-पॉस लागू करण्यासंबंधी राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात मागील आठवडाभर गतीने कार्यवाही झाली. त्यात काही विक्रेत्यांकडे मागील महिन्यातच ई-पॉस मशिन बसविले होते. त्यांनी त्या मशिनच्या आधारे खत विक्री सुरू केली होती; परंतु काही विक्रेत्यांकडे मशिन नव्हते. ती संबंधित खत कंपन्यांकडून मागवून बसविण्याची कार्यवाही झाली. आजघडीला ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बुधवारी कृषी आयुक्तांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आली. त्याचे आयुक्त यांनी कौतुक केले. 

जिल्ह्यात ई-पॉस बसविण्यासंबंधीचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून, आता फक्त सात कृषी केंद्रांवर सात ई-पॉस मशिनची गरज आहे.

तांत्रिक अडचणी कायम
कृषी आयुक्तांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक अडचणींचाही मुद्दा निघाला. त्यावर आयुक्त यांनी प्रथम कृषी विभागाने टेक्‍नोसेव्ही व्हावे, तंत्रज्ञान आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. यातच जिल्ह्यात अजूनही अनेक खत विक्रेत्यांकडे ई-पॉस मशिनवर आधार क्रमांक लिंक न होणे, सर्व्हर डाउनमुळे कामकाज थांबणे, अशा अडचणी येत आहेत, असे कृषी अधिकारी शिंपी यांनी स्पष्ट केले.
 
 

 

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...