agriculture news in Marathi, 91 sugar factories start crushing, Maharashtra | Agrowon

राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली; उतारा कमी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. पहिल्या टप्प्यात ८.८५ टक्के इतका कमी उतारा मिळत आहे. गेल्या हंगामात १०१ सहकारी व ८७ खासगी कारखान्यांना ९.०५ लाख हेक्टरवरील ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून १०७ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा आतापर्यंत ५१ सहकारी व ४२ खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 

पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. पहिल्या टप्प्यात ८.८५ टक्के इतका कमी उतारा मिळत आहे. गेल्या हंगामात १०१ सहकारी व ८७ खासगी कारखान्यांना ९.०५ लाख हेक्टरवरील ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून १०७ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा आतापर्यंत ५१ सहकारी व ४२ खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 

‘‘हंगामात धुराडी पेटवण्यात आघाडी घेतलेल्या कारखान्यांनी ५७.३९ लाख टन उसाची खरेदी शेतकऱ्यांकडून केली आहे. त्याचे गाळप करून ५०.८० लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे उतारा कमीच आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांचा एकूण साखर उतारा ११.२४ टक्के इतका नोंदविला गेला होता. उतारा जादा असल्यास साखर उत्पादन वाढते. सर्वात कमी उतारा २०१४-१५ च्या हंगामात ११.३ टक्के इतका मिळाला होता. गाळपासाठी यंदा आतापर्यंत १३३ कारखान्यांना परवाने देण्यात आलेले आहेत. अजून १९ कारखान्यांना परवाने देता येतील. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे परवाने वाटलेले नाहीत. 

‘‘राज्यातील काही कारखान्यांनी थकविलेली एफआरपी व्याजसह मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. राज्य शासनाने आपल्या प्रतिज्ञापत्रात अशा २९ कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, असे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे या कारखान्यांना परवाना दिला गेलेला नाही,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

एफआरपी थकविलेल्या १६ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलेले आहे. मात्र, त्यात व्याज अदा केलेले नाही. त्यामुळे या पेमेंटला कायदेशीर म्हणावे किंवा कसे याबाबत शासनाकडून चाचपणी केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत यातील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...