agriculture news in Marathi, 924 e-pos machines distributed in solapue district, Maharashtra | Agrowon

सोलापुरात ९२४ ई-पॉस मशिनचे वाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

शेतकऱ्यांची सोयच झाली आहे. थोडासा त्रास होणारच, पण आता खताची वेळेवर आणि योग्य दरात विक्री होईल. अफरातफरीला विक्रेत्यांना वाव नसेल. ही योजना चांगली आहे.  - अप्पा कोरके, शेतकरी, गुळवंची, ता. उत्तर सोलापूर.

सोलापूर ः रासायनिक खत विक्रीत पारदर्शकता येण्यास किरकोळ खतविक्रेत्यांना ‘पॉस’ मशिनद्वारे खत विक्री करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात ९२४ ‘पॉस’ मशिनचे वाटप केले आहे, पण त्यापैकी सध्या ९०० मशिन कार्यरत आहेत. त्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी २४ मशिन कार्यरत झालेल्या नाहीत. त्याही लवकरच कार्यरत होतील, त्यामुळे खतविक्रीत कोणतीच अडचण नाही. अद्याप कुठेच वापर सुरू नाही, येत्या आठवड्यात तो सुरू होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.  

जिल्ह्यातील अनुदानित रासायनिक खतविक्रेत्यांना ‘पॉस'' मशिनचा वापर बंधनकारक आहे. ‘पॉस’ मशिनचा वापर न केल्यास विक्री परवाना रद्द करण्यात येणार आहे. ज्या खतविक्रेत्यांना अनुदानित खतांशिवाय इतर पाण्यात विरघळणारी खते, सूक्ष्म मूलद्रव्ये व जैविक खतांचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी परवान्यामधून अनुदानित खतांचे स्रोत वगळण्याचा प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. एवढेच नाही तर खत विक्री केंद्रात अनुदानित खताची विक्री होत नसल्याबाबतचा फलक लावण्याच्या सूचनाही दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जे घाऊक खतविक्रेते आहेत, त्यांनी किरकोळ खतविक्रेते पॉस मशिनच्या साहायाने खतांची विक्री करतात की नाही, हे पाहण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या. 

शेतकऱ्यांची या निर्णयामुळे सोयच झालेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून त्याचे स्वागत होत आहे. या मशिनलाही शेतकऱ्यांच्या आधार कार्डची जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे पारदर्शकपणे या खताची खरेदी-विक्री होणार आहे. 

प्रतिक्रिया
खत विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खतांची विक्री पॉस मशिनच्या साहायाने होते की नाही, याची खात्री करायची आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास कंपनीला संबंधित खताचे अनुदान मिळणार नाही. 
- एस. पी.  बेंदगुडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

आम्ही सगळ्या तांत्रिक बाबी तपासून मशिन वाटप केल्या आहेत. त्याची पडताळणीही करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत पॉसशिवाय खताचे वाटप होणार नाही, याकडे लक्ष देत आहोत. येत्या आठवडाभरात सगळे कामकाज सुरळीत सुरू होईल. 
- दत्तात्रय येळे, मोहिम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

 

इतर बातम्या
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला...नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे...
...जीव लावलाय मालकावरीकोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस...
शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा...अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरलेनागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी...पुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी...
तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटकापुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान...अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग...
तापमानातील तफावत कायमपुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...