agriculture news in Marathi, 93 villages include in smart village, Maharashtra | Agrowon

राज्यातील ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे: आदर्श गाव योजनेत सहभागी होण्यासाठी तीन जिल्ह्यांमधून आलेल्या नव्या प्रस्तावांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यभर आता ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध लागले आहेत. 

पुणे: आदर्श गाव योजनेत सहभागी होण्यासाठी तीन जिल्ह्यांमधून आलेल्या नव्या प्रस्तावांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यभर आता ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध लागले आहेत. 

राऊतवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा), गोवले (माणगाव, रायगड) आणि केरा (दोडामार्ग, सिंधुदुर्ग) या तीन गावांचा समावेश आदर्श गाव योजनेत नुकताच झाला आहे. ‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी या गावांना भेटी दिल्यानंतरच योजनेत सहभागाला अंतिम मंजुरी दिली गेली. आदर्श गाव करण्यासाठी राज्यात अनेक गावांमध्ये धडपड सुरू आहे. मात्र, त्यासाठी गावातील एकोपा व गावकऱ्यांची चिकाटी महत्त्वाची समजली जाते.

या तीन गावांमधील गावकऱ्यांनी प्रथम ग्रामसभा बोलावून गावाला आदर्श गाव योजनेत गाव निवडीचा ठराव केला होता. धुळे जिल्ह्यातून देखील एका गावाचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे आला आहे. त्यामुळे लवकरच चौथ्या गावाचाही समावेश आदर्श गाव योजनेत होण्याची शक्यता आहे. 
हिवरेबाजार किंवा राळेगणसिद्धीप्रमाणेच या गावांमध्ये देखील ग्रामविकासाचा सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्याचा संकल्प तेथील गावकऱ्यांनी केला आहे. यात नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी, बोअरवेल बंदी आणण्याचे ठराव या गावांनी केले आहेत. 

आदर्श गाव योजनेत समावेश होण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या आत असावी लागते. गावाचे महसुली क्षेत्र अडीच हजार हेक्टरपर्यंत असावे लागते. त्यासाठी तलाठ्याकडून सिंचन व महसुली क्षेत्राचे प्रमाणपत्र जोडावे लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पाणलोटाची कामे करण्यासाठी या गावांमध्ये कृषी, तसेच इतर विभागांकडून मदत केली जाते. याशिवाय सदर गावांना क्षेत्रानुसार प्रतिहेक्टरी १२ हजार रुपये अनुदान मिळते. आदर्श गावांमध्ये गावकऱ्यांकडून विविध ४० बाबींवर कामे केली जातात. 

पाण्याचा ताळेबंद, आरोग्य, शिक्षण, वनीकरण, व्यसनमुक्ती, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, सामाजिक सलोखा, पीकरचनेतील बदल अशा प्रमुख बाबी यशस्वीपणे राबविल्या तरच गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळतो. 

‘‘राज्यात कोठाडे, निवडुंगवाडी, पिंपळगाव कवठा, दवणगाव, पिंपळसकवडा, खोर अशी वीसपेक्षा जादा गावे आदर्श झाली आहेत. श्री.पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ९३ गावांना आदर्श करण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे,’’ अशी माहिती आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे उपसंचालक महादेव निंबाळकर यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...