agriculture news in marathi, 94 percent crop loan distribution in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात ९४ टक्के पीककर्जाचे वितरण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६८० कोटी १ रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर एक हजार ५७१ कोटी ७८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ९४ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ११६२ कोटी १३ लाख रुपये वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक कर्जवितरण केले आहे.

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६८० कोटी १ रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर एक हजार ५७१ कोटी ७८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ९४ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ११६२ कोटी १३ लाख रुपये वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक कर्जवितरण केले आहे.

खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक हजार ६८ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरअखेर खरीप पेरण्यांचा कालावधी असतो. या मुदतीत उद्दिष्टाच्या ९४ टक्के वाटप झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत. पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवितरण केले आहे.

या हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेस ९५० कोटींचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे या बॅंकेने ११६२ कोटी १३ लाखांचे वाटप केले असून, १२२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेने पीककर्ज वितरण होण्यासाठी शाखानिहाय शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले होते. यामुळे या बँकेचे पीककर्ज वितरण जास्त झाले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १०५ कोटींचे उद्दिष्ट होते.

यापैकी या बँकेने ९७ कोटी ७० लाखांचे म्हणजेच ९३ टक्के कर्जवाटप केले. स्टेट बॅंक ऑफ इंडियास १०५ कोटींचे उद्दिष्ट होते. यापैकी या बँकेने ८८ कोटी ६४ लाखांचे म्हणजेच ८४ टक्के कर्जवाटप केले. बँक ऑफ इंडियास १०० कोटींचे उद्दिष्ट होते. यापैकी या बँकेने ६७ कोटी सात हजारांचे म्हणजेच ६७ टक्के कर्जवाटप केले आहे.

बॅंकांवर कारवाई होणार का?
जिल्हा मध्यवर्ती, राष्ट्रीयीकृत बॅंकांत बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या बँकांचा अपवाद वगळता इतर बँकांनी कर्जवितरणाकडे दुर्लक्ष केले आहे. बहुतांशी बँकांनी उद्दिष्टांच्या ५० टक्केही कर्जवितरण केलेले नाही. यामध्ये राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचा समावेश आहे. यामुळे या बँकावर करवाई केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...