agriculture news in Marathi, 94 thousand farmers waiting for loan waiving in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरातील ९४ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कर्जमाफीच्या यादीमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच फेब्रुवारीपूर्वी आपापल्या बॅंकेमध्ये जाऊन त्रुटींची पूर्तता करावी. ‘ओटीएस’साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी दीड लाखाच्या वरील पैसे भरावेत. 
- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक 
(सहकारी संस्था), सोलापूर

सोलापूर ः जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या ९४ हजार ४६३ शेतकऱ्यांची माहिती अजूनही जुळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतीक्षाच वाट्याला आली आहे. जिल्हा प्रशासनाने आता या शेतकऱ्यांच्या अर्जांची नव्याने पडताळणी करण्याचे ठरवले आहे. त्या शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडे दिली आहे; पण त्यासाठी या शेतकऱ्यांनी आपल्या बॅंकेशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज, बॅंकांकडील उपलब्ध माहिती जुळत नसल्याने कर्जमाफी योजना राबविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांमधील ९४ हजार ४६४ शेतकऱ्यांची माहिती जुळली नाही. यादीमध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच फेब्रुवारीपर्यंत संबंधित बॅंकेत जाऊन यादीतील त्रुटी दूर करायच्या आहेत.

जिल्हा बॅंकेकडील अर्जांच्या पडताळणीसाठी ६९ लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या १ ते ६६ कॉलममध्ये शेतकऱ्यांची माहिती भरून ती तालुकास्तरीय समितीकडे द्यायची आहे. समिती शहानिशा करून पुढील निर्णय घेणार आहे. जिल्हा बॅंकेचे खातेदार असलेल्या ५१ हजार ७७५ शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी २६५ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. तर राष्ट्रीयीकृत बॅंकांतील ३१ हजार ६०८ शेतकऱ्यांना १८६ कोटी २९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा बॅंकेतून कर्ज घेतलेल्या दीड लाखापुढील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १५ हजार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...