agriculture news in marathi, 99 lakh new cardholders will take food security benefit | Agrowon

नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्नसुरक्षेचा फायदा ः बापट
वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.  श्री. बापट म्हणाले, की यात ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ व २ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.  श्री. बापट म्हणाले, की यात ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ व २ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

 नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता ३० सप्टेंबर २०१६ ऐवजी ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, ३० एप्रिल २०१८ पर्यंत आधार सीडिंग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी, २०१४ पासून करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने राज्य शासनास जनगणना २०११ नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामीण लोकसंख्येच्या ७६.३२ टक्के (४.७० कोटी) व शहरी लोकसंख्येच्या ४५.३४ टक्के (२.३० कोटी) याप्रमाणे राज्यासाठी एकूण ६२.३० टक्के (७.०० कोटी) एवढा इष्टांक दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...