Agriculture news in marathi, 9th in the state of Dhule in the grain distribution by e-pot machine | Agrowon

`ई-पॉस मशिन'द्वारे धान्य वितरणात धुळे राज्यात नववे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

ई-पॉस मशिनद्वारे रेशन धान्य वितरणात पारदर्शीपणा आला आहे. नेटवर्कच्या अडचणी येऊनही केवळ जिल्हाधिकारी रेखावार यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळत आहे. लाभार्थ्यांनी शिधापत्रिका आधार लिंकिंग करून धान्य घ्यावे. धान्य घेताना सोबत पावतीही घ्यावी. दुर्गम भागातही असे पॉस मशिन बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- गोविंद शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे 

धुळे : काळा बाजार राेखण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांत "पॉइंट ऑफ सेल'' अर्थात `पॉस' मशिन आणले असून, जिल्ह्यातील एकूण ९८० पैकी ९५९ रेशन दुकानदारांनी या मशिनचा नियमित वापर सुरू केला आहे. "ई-पॉस'' मशिनद्वारे धान्य वितरणाचे व्यवहार करण्यात धुळे जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर आला आहे.
 
स्वस्त धान्य दुकानांतील गैरप्रकारांना आळा बसावा, शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना रोखीने व्यवहार करणे सोपे व्हावे म्हणून बायोमेट्रिक सेल यंत्रणा बसविण्यात आली आहे. असे मशिन वापरण्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. धुळे जिल्ह्याचा नववा क्रमांक, तर नाशिक विभागात जळगाव १७, नगर १८, नाशिक २२, नंदुरबार ३७ व्या क्रमांकावर आहे. 
 
ई-पॉसचा ९५९ दुकानांमध्ये वापर जिल्ह्यात एकूण ९८० स्वस्त धान्य दुकाने, तर १४ लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी ९५९ रेशन दुकानांमध्ये "पॉस मशिन''द्वारे धान्य वितरणास सुरवात झाली आहे. उर्वरित २१ दुकाने ही शिरपूरसारख्या दुर्गम भागातील असल्याने तेथे "नेटवर्क''च्या अडचणी येत आहेत. "पॉस''चा वापर सक्‍तीचा केल्याने सर्वच दुकानांमध्ये असे व्यवहार सुरू झाले आहेत.
 
व्यवहारात पारदर्शीपणा
या मशिनच्या माध्यमातून रेशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना व किती रुपयात दिले, याची अचूक माहिती मिळते. "जीपीएस'' प्रणालीसोबत संलग्न असलेल्या या मशिनमुळे रेशन दुकानदार आता ग्राहकांची फसवणूक करू शकत नाही, यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना धान्य वाटपात पारदर्शीपणा आला आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...