मराठवाड्यात सोळा लाख कर्जमाफीच्या अर्जाला आधार जोडणी

कर्जमाफी
कर्जमाफी

औरंगाबाद : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी मराठवाड्यातून १६ लाख ५३ हजार ३९७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे आधार जोडलेले असून, ४९ हजार ५०१ कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना आपले आधारच जोडले नसल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. सहकार विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसाठी राज्यभरातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील १६ लाख ५३ हजार ३९७  शेतकऱ्यांच्या अर्जांचा समावेश आहे. दुसरीकडे अर्जांपैकी राज्यात आधार जोडणी असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या ५४ लाख १७ हजार ७६५ असून, त्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या अर्जांचा समावेश आहे. राज्यभरात २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यांना आधार कार्ड जोडलेले नसून, त्यामध्ये मराठवाड्यातील ४९ हजार ५०१ शेतकऱ्यांच्या अर्जांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  कर्जमाफीचा लाभ गरजू लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी व या योजनेतून कुणीही वंचित राहू नये यासाठी गावोगावी चावडीवाचनही घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे चावडीवाचनाचे काम काही गावांमध्ये निवडणूक असल्याने आचारसंहितेमुळे गतिरोध आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मराठवाड्यातील आधार असलेले व नसलेल्या अर्जांची संख्या जिल्ह-------आधार नसलेले---आधार असलेले---एकूण अर्ज औरंगाबाद---७६८७--------------२६०७१५-----------२६८४०२ बीड----------९३८५--------------२६५९६७------------२७५३५२ हिंगोली-------१६३२------------१०७७५३------------१०९३८५ जालना-------८७७३-------------२०६६३४----------२१५४०७ लातूर--------४८१५-------------१९३३८६-----------१९८२०१ नांदेड--------१०७९५-----------२५५३३८-----------२६६१३३ उस्मानाबाद---३०००---------१३६५७७-------------१३९५७७ परभणी-------३४१४-----------१७७५२६-----------१८०९४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com