आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार

आधार जोडणीची मुदत  ३१ मार्चपर्यंत वाढणार
आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार

नवी दिल्ली : विविध सेवा आणि कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याची मुदत पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वाढविली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. यासंबंधीचा अध्यादेश आज (शुक्रवारी) काढला जाऊ शकतो, असेही स्पष्ट केले. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर केंद्राने यासंबंधीचे निवेदन केले. आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतरिम दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याच्या दृष्टीने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली जाऊ शकते, असे खंडपीठानेही सांगितले. आधार जोडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या वरिष्ठ वकील श्‍याम दिवाण यांच्या मागणीला ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी खंडपीठासमोर याचा जोरदार विरोध दर्शविला. ते म्हणाले, की  गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आधार योजनेला स्थगिती देता येवू शकत नाही. सध्याची ३१ डिसेंबरची मुदत वाढविली जाईल आणि त्यासंदर्भात आज (शुक्रवारी) अध्यादेश काढला जावू शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com