agriculture news in marathi, Aadhar Number not mandatory for Mobile, Bank purpose | Agrowon

मोबाईल, बँकेत 'आधार' अनिर्वाय नाही : सर्वोच्च न्यायालय
वृत्तसंस्था
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी 'आधार कार्ड' असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. 'आधार'च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे 'आधार'चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही. 

नवी दिल्ली : शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी 'आधार कार्ड' असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. 'आधार'च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे 'आधार'चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही. 

'आधार'मुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या आशयाच्या 31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज निर्णय दिला. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अर्जनकुमार सिक्री, न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे. 

गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी आणि इतर कारणांसाठी 'आधार' सक्ती केली होती. त्यातील काही गोष्टींसाठीची सक्ती रद्द केली असली, तरीही 'आधार' घटनात्मकरित्या वैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

'आधार' सक्ती कशासाठी नाही? 

  • शाळेतील प्रवेश 
  • बँक खाते उघडणे  
  • नवे मोबाईल कनेक़्शन घेणे

'आधार' कशासाठी गरजेचे? 

  • पॅन कार्ड 
  • प्राप्तिकर भरण्यासाठी (इन्कम टॅक्‍स रिटर्न) 

'आधार'विषयी आणखी काही.. 

  • बेकायदा स्थलांतरितांसाठी 'आधार' नाही 
  • कोणतीही खासगी मोबाईल कंपनी 'आधार'चा डेटा घेऊ शकत नाही  
  • लोकसभेमध्ये 'आधार' विधेयक 'वित्त विधेयक' म्हणून मंजूर करणे योग्य 
  • नागरिकांची गोपनीय माहिती सुरक्षित राखण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर अभेद्य यंत्रणा निर्माण करावी 
  • 'आधार'साठी सध्या असलेले सुरक्षेचे उपाय पुरेसे; 'आधार'ची गोपनीय माहिती मिळवून नागरिकांवर हेरगिरी करणे अशक्‍य

इतर बातम्या
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
औरंगाबादेत कामगारांची निदर्शने औरंगाबाद : बाजार समितीमधून हमाल-मापाड्यांची...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध...नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी...
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...