agriculture news in marathi, AAP to enter state soon | Agrowon

‘आप’चा लवकरच राज्यात प्रवेश
संजय मिस्कीन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई : ‘जनलोकपाल’चे आंदोलन महाराष्ट्रातून उभे राहिले व त्यातून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्या महाराष्ट्रातच आम आदमी पक्षाची मात्र अद्याप मुहूर्तमेढ रोवली नसली तरी १२ जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होणार असून, राज्यात ‘आप’ची एन्ट्री होणार असल्याचे सूचित केले जात आहे.

मुंबई : ‘जनलोकपाल’चे आंदोलन महाराष्ट्रातून उभे राहिले व त्यातून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्या महाराष्ट्रातच आम आदमी पक्षाची मात्र अद्याप मुहूर्तमेढ रोवली नसली तरी १२ जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होणार असून, राज्यात ‘आप’ची एन्ट्री होणार असल्याचे सूचित केले जात आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे निमित्त साधत अरविंद केजरीवाल राज्यात आम आदमी पक्षाची भूमिका मांडतील, असे मानले जात आहे. जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्याचदिवशी सिंदखेडराजा येथे जाहीर सभा असल्याने ‘मराठा कार्ड’ आत्मसात करण्याचा आम आदमीचा प्रयत्न असू शकतो का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अरविंद केजरीवाल यांना सिंदखेडराजाला येण्याचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण स्वीकारत त्यांनी जाहीर सभादेखील आयोजित केली आहे. यासाठी शंभराहून अधिक कार्यकर्ते सभेच्या तयारीसाठी झटत आहेत. आम आदमी पक्षात राज्यभरातून प्रवेश करू इच्छिणाऱ्यामध्ये नव्या चेहऱ्यांसोबत माजी अधिकारी यांचाही मोठा वर्ग असल्याचे सूत्रांचे मत आहे.

दिल्लीत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर ‘आप’ पंजाब व हरियानामधे जोरदार तयारी केली होती. पंजाबमध्ये त्यांना काही प्रमाणात यश आले. नागरी मानसिकतेचा पक्ष म्हणून आम आदमीची ओळख असली, तरी पंजाबात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर पक्षाने जोरदार रान पेटवले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकरीवर्गाला लक्ष्य करूनच पक्षाची भविष्यातील वाटचाल राहू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...