agriculture news in marathi, Aaran will be developed assures rural minister Pankaja Munde | Agrowon

अरणच्या विकासासाठी निधीची चिंता नको : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

सोलापूर : ‘‘अरणच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे एक कोटी ६५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. आणखी काय हवे ते मागा, अरणच्या सर्वंकष विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, कृती आराखडा द्या, निधीची चिंताच करू नका,’’ असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. १३) अरण (ता. माढा) येथे सांगितले. 

सोलापूर : ‘‘अरणच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे एक कोटी ६५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. आणखी काय हवे ते मागा, अरणच्या सर्वंकष विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, कृती आराखडा द्या, निधीची चिंताच करू नका,’’ असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. १३) अरण (ता. माढा) येथे सांगितले. 

अरण (ता. माढा) येथे संत सावता माळी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित माळी समाज मेळाव्यात ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर संयोजक कल्याणराव आखाडे, आमदार अतुल सावे, आमदार मनीषा चौधरी (मुंबई), नामदेव राऊत, शंकर वाघमारे, छगन म्हेत्रे, शंकरराव बोरकर, भास्करराव अंबेकर आदी उपस्थित होते. 

श्रीमती मुंडे म्हणाल्या, ‘‘ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्यांनी राजा-राजांमध्ये भांडणे लावली, ते गेले पण त्यांची वंशावळ देशात, राज्यात अजून आहे. ते माणसामाणसांत भिंती उभा करतात, हे आपण ओळखायला पाहिजे आणि समाजहितासाठी एकत्र यायला पाहिजे. समाजहिताचे निर्णय घेताना त्रास होतो, तो मलाही झाला. मला ज्यांनी त्रास दिला त्यांचे पाय धरून मी पाया पडले. ज्यांनी त्रास दिला त्यांची गळाभेट घेऊन मी अभिनंदन केले. विचारांची वज्रमूठ बांधली पाहिजे. वंचित, गरीब, पीडित अशा समूहाची ओळख तयार व्हायला पाहिजे.’’ 

सावता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अरण व माळी समाजाच्या विकासाबाबत त्यांनी या वेळी विविध मागण्या केल्या. या वेळी आमदार सावे, आमदार चौधरी, नामदेव राऊत, शंकर वाघमारे, छगन म्हेत्रे, शंकरराव बोरकर, भास्करराव अंबेकर यांनी मार्गदर्शन केले. संघटना प्रवक्ते प्रा. राजीव काळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष राजगुरू यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...