agriculture news in marathi, aashadhi wari planning, buldhana, maharashtra | Agrowon

संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला प्रस्थान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

शेगाव, जि. बुलडाणा  ः पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी ८ जूनला प्रस्थान करेल. श्री संत गजानन महाराज यांचा हा पालखी सोहळा राजवैभवी थाटात भजनी, दिंडी, गज व अश्‍वांसह निघणार आहे.

शेगाव, जि. बुलडाणा  ः पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी ८ जूनला प्रस्थान करेल. श्री संत गजानन महाराज यांचा हा पालखी सोहळा राजवैभवी थाटात भजनी, दिंडी, गज व अश्‍वांसह निघणार आहे.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात राज्याच्या विविध भागांतून दिंड्या दाखल होतात. शेगाव येथील संत गजानन महाराज पालखी  १९६८ पासून पंढरपूरला पायी जात आहे. या वर्षी पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. दरवर्षी ही पालखी ७२५ किलोमीटर पायी प्रवास करते. तर परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटरचा आहे. या वर्षी ८ जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे पालखी प्रस्थान करणार आहे. या वर्षाच्या पालखी सोहळ्यासाठी शेगाव संस्थानने चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिराकडून तयार करून घेतली आहे. 

असा असेल पालखीचा मार्ग
शेगाव येथून ८ जून रोजी पालखी निघून श्री क्षेत्र नागझरी मार्गे जाईल. पारस, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातूर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढामार्गे १० जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोचेल. १० ते १५ जुलै या काळात पालखीचा तेथेच मुक्काम राहील. त्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघेल. करकंब, कुर्डूवाडी, भगवान बार्शी, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेड राजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगावमार्गे ६ ऑगस्टला पालखी शेगावमध्ये दाखल होईल.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...