agriculture news in marathi, Aattma Scheme in crises as government transfers officers | Agrowon

‘आत्मा’ विभाग बनतोय असाह्य
राजकुमार चौगुले
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : शासनाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या ११ जिल्ह्याच्या प्रकल्प संचालकांच्या बदल्या कृषी विभागात केल्याने आत्माची स्वतंत्र यंत्रणाच खिळखिळी होण्याची शक्‍यता आहे. शासनाच्या या बदलीसत्रामुळे या विभागाचे भवितव्य अंधातरी बनले आहे. यामुळे या यंत्रणेने तयार केलेले शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, शेतकरी मित्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. 

कोल्हापूर : शासनाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या ११ जिल्ह्याच्या प्रकल्प संचालकांच्या बदल्या कृषी विभागात केल्याने आत्माची स्वतंत्र यंत्रणाच खिळखिळी होण्याची शक्‍यता आहे. शासनाच्या या बदलीसत्रामुळे या विभागाचे भवितव्य अंधातरी बनले आहे. यामुळे या यंत्रणेने तयार केलेले शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, शेतकरी मित्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. 

राज्य शासनाने नुकत्याच जिल्हा स्तरावर असणाऱ्या आत्मा प्रकल्प संचालकांच्या बदल्या प्राधान्याने कृषी विभागातील रिक्त स्थानावर केल्या आहेत. यामुळे आता प्रकल्प संचालकांची ही पदे रिक्त झाली आहेत. अनेक ठिकाणी हा कार्यभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा आत्मा विभागातील कनिष्ठ प्रकल्प उपसंचालकाकडे देण्यात आला आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ६०:४० अशा पद्धतीने खर्चाचे नियोजन करण्यात आले. यानुसार आत्मा हा विभाग २०१० पासून स्वतंत्र समर्पित यंत्रणेद्वारे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात कार्यान्वित आहे. या माध्यमातून १ लाख १२ हजार शेतकरी गट राज्यात स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटात सरासरी १५ ते २० शेतकरी आहेत. शेतकरी गटाद्वारे जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना आत्मा यंत्रणेने कृषी विभागाशी जोडले आहे.

या शेतकऱ्यांना शेतकरी सहली, प्रशिक्षण, शेतकऱ्यांचे गट नोंदणी करणे, कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्रे यांनी केले संशोधन या गटांपर्यंत पोचविण्यापर्यत काम ही यंत्रणा करते. राज्यामध्ये १५०० तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांची पदे मंजूर असताना शासनाने गेल्या दोन वर्षांत त्यांची संख्या विविध कारणाने कमी करून ती साडेपाचशेवर आणली आहे. यामुळे ही यंत्रणा पंगू करण्याचे काम वरिष्ठ स्तरावरून सुरू असल्याचा आरोप होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...