agriculture news in Marathi, abasaheb vir award to vinaykrav patil, Maharashtra | Agrowon

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव पाटील यांना जाहीर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेले नाशिक येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'' जाहीर करण्यात आला आहे.

सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेले नाशिक येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'' जाहीर करण्यात आला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जलसंधारण व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून राज्यातील युवा शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवणारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना तिसरा ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार'' जाहीर करण्यात आला.

२ सप्टेंबर रोजी आबासाहेब वीर यांच्या ११३ व्या जयंतीदिनी गोकुळ अष्टमीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

या वेळी श्री. भोसले म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या एकवीस वर्षांपासून ‘‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’’ प्रदान करण्यात येतो. 

पुरस्काराचे यंदाचे २२ वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करून समाजहित साधणाऱ्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्ल्या व्यक्तींना कारखान्यांच्या वतीने प्रतिवर्षी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...