agriculture news in Marathi, About 12 crore loan disbursements: Guardian Minister by Annasaheb Patil Mahamandal | Agrowon

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी कर्जवाटप ः पालकमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी १० लाखांपर्यंतच्या कर्जाची हमी शासनाने घेतली आहे. याचे पाच वर्षांपर्यंतचे व्याज शासन भरणार आहे. या महामंडळामार्फत जिल्ह्यात ३२०० अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र दिले असून, १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी १० लाखांपर्यंतच्या कर्जाची हमी शासनाने घेतली आहे. याचे पाच वर्षांपर्यंतचे व्याज शासन भरणार आहे. या महामंडळामार्फत जिल्ह्यात ३२०० अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र दिले असून, १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीयीकृत बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 

यापुढील काळात सहकारी बँकामार्फतही कर्ज देण्याबाबत शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही देत पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापुरात महामंडळाचे कार्यालय स्थापन केल्यामुळे महामंडळाच्या कामाला निश्‍चितपणे गती मिळेल. जिल्ह्यातील गरजूंनी महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. जीएसटी, स्टॅंप आदीद्वारे राज्याच्या उत्पन्‍नात वाढ झाली आहे.

प्रारंभी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी यांनी स्वागत करून महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्‍तिक कर्ज, गट कर्ज आणि गट प्रकल्प कर्ज योजनेची माहिती दिली. 

कार्यक्रमास महापौर सरिता मोरे, खासदार धनंजय महाडिक, महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अधीक्षक अभियंता संभाजी माने, अरुण दुधवडकर, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक जे. बी. करीम, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...