agriculture news in Marathi, above one lack farmers are waiting for equipment's, Maharashtra | Agrowon

राज्यात सव्वा लाख शेतकरी अवजारांच्या प्रतीक्षेत
हेमंत पवार
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

शासनाच्या कृषी विभागाने कृषी अवजारांसाठी तरतूद केलेल्या निधीचा पूर्णतः वापर करून जेवढे अर्ज दाखल झाले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना कृषी अवजारे द्यावीत, अन्यथा त्याविरोधात आंदोलन करू.
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांपुढील शेतमजुरांची समस्या कमी करून त्यांना मशागत आणि पीक काढणीसाठी उपयोगी पडणारी छोटी अवजारे देण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतलेला आहे. कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत १ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी केवळ एक हजार ४१ शेतकऱ्यांनाच सप्टेंबरपर्यंत अवजारांसाठीचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित १ लाख २२ हजारांवर शेतकरी अजूनही अवजारांसाठी ‘वेटिंग’वर आहेत.  

शेती कामासाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. दिवसाकाठी ४०० ते ५०० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यावर पर्याय म्हणून शासनाच्या कृषी विभागाने शेती कामे वेळेत आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पूर्ण व्हावीत यासाठी त्यांना अनुदानावर अवजारे उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले. त्यानुसार शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियानातून छोटे ट्रॅक्‍टर, पॉवरटीलर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, भातपेरणीसाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, उसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर यासह अन्य अवजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. 

शेतकऱ्यांना अवजारे त्यांच्या पसंतीने घेण्याची सवलत कृषी विभागाने दिली आहे. शासनाकडून कृषी यांत्रिकीरणासाठी १९८.७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी विस्तारित कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी ६१.७४ कोटी रुपयांची तरतूद होती.

कृषी यांत्रिकरणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातून एक लाख २३ हजार २७२ अर्ज कृषी विभागाकडे जमा झाले. त्यातील ३९ हजार ३८० निवडपात्र शेतकऱ्यांना कळवण्यात आले. त्यापैकी एक हजार ४१ शेतकऱ्यांना आठ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान सप्टेंबपर्यंत देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित एक लाख २२ हजारांवर शेतकरी अजूनही ‘वेटिंग’वरच आहेत.  

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...