agriculture news in Marathi, abstacles in online registration for MSP, Maharashtra | Agrowon

ऑनलाइन नोंदणीचे तीनतेरा
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

अकोला ः या हंगामात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीच्या अनुषंगाने ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाली खरी; मात्र यंत्रणा सुरू करण्यातच एक आठवडा गेला. अद्यापही अनेक ठिकाणी नोंदणीची प्रक्रीया सुरु झालेली नाही. काही ठिकाणी गुरुवारपासून (ता. चार) सुरू करण्यात आली. शिवाय काही ठिकाणी एकाच संगणकावर नोंदणी केली जात असल्याने प्रक्रिया अत्यंत संथ पद्धतीने होत आहे.

अकोला ः या हंगामात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीच्या अनुषंगाने ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाली खरी; मात्र यंत्रणा सुरू करण्यातच एक आठवडा गेला. अद्यापही अनेक ठिकाणी नोंदणीची प्रक्रीया सुरु झालेली नाही. काही ठिकाणी गुरुवारपासून (ता. चार) सुरू करण्यात आली. शिवाय काही ठिकाणी एकाच संगणकावर नोंदणी केली जात असल्याने प्रक्रिया अत्यंत संथ पद्धतीने होत आहे. यामुळे वेळेत (९ ऑक्‍टोबरपर्यंत) मूग, उडदाची नोंदणी कशी होईल हा पेच बनलेला आहे; तर काही ठिकाणी शासनाने १ ऑक्‍टोबरपासून सोयाबीनसाठी ऑनलाइन नोंदणीची घोषणा केलेली असताना त्याबाबतही अशीच स्थिती समोर आली आहे. 

या हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले आहे. मूग, उडदासाठी २५ सप्टेंबरपासून ९ ऑक्‍टोबरपर्यंत; तर सोयाबीनसाठी एक ते ३१ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली. खरेदी केंद्रांना याबाबत आधीच पत्र देण्यात आले होते. मात्र केंद्रांची नावे नवीन नियमांनुसार अंतिम करण्यात वेळ लागत आहे. जेथे केंद्र सुरू होईल हे निश्‍चित झाले, त्या ठिकाणी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी हवा असलेला पासवर्ड मिळायला आठवडयापेक्षा अधिक काळ गेला आहे.

अद्यापही बऱ्याच ठिकाणी केंद्र चालविण्यासाठी संस्थांचे प्रस्तावच अंतीम झालेले नसल्याने अनिश्‍चितता आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीसुद्धा सुरू झालेली नाही. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात हा प्रश्‍न अधिक तीव्र आहे.

काही केंद्रांना चक्क गुरुवारी (ता. चार) सायंकाळी पासवर्ड मिळाला आहे. त्यानंतर नोंदणी सुरू झाली. परंतु मूग, उडदाच्या नोंदणीसाठी ९ ऑक्‍टोबरची मुदत दिलेली असून आता उरलेल्या अवघ्या चार दिवसांत किती शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकेल हाही प्रश्‍नच बनलेला आहे. 

शेतकऱ्यांची संख्या पाहता किमान एका केंद्रावर तीन ते चार संगणक चालविले तरच नोंदणी होईल. मात्र अशी नोंदणी करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा नोंदणी पासवर्ड हवा असतो, असे काही केंद्र चालकांनी सांगितले. परंतु एकच पासवर्ड पुरविण्यात आल्याने गोंधळ वाढण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी केंद्राला गुरुवारी सायंकाळी पासवर्ड मिळाला. यामुळे या ठिकाणी आता केवळ मूग, उडदाचीच नोंदणी आधी सुरू करण्यात आली. तेथे सोयाबीन उत्पादकांना नाव नोंदणीसाठी ९ ऑक्‍टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी सातत्याने यंत्रणांकडे प्रश्‍नांचा भडीमार करीत आहेत. 

पेरेपत्रकासाठीही जाच
मूग, उडीद, सोयाबीनच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करताना शेतकऱ्यांना या हंगामाचा सातबारा व पेरेपत्रक द्यावे लागते. परंतु अनेक ठिकाणी तलाठी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणची माहिती अपडेट झालेली नसल्याने पेरेपत्रक बनत नाही. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी सातबारा, पेरेपत्रक,  आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स जोडणे बंधनकारक आहे. 

उत्पादकेअभावी खरेदीत खोडा
पिकांची उत्पादकता किती गृहीत धरावी हेसुद्धा सध्या निश्‍चित झालेले नाही. जोपर्यंत उत्पादकता निश्‍चित होत नाही तोवर खरेदी किती करावी हे ठरणार नाही. यासाठी कृषी खात्याकडून पिकांची उत्पादकता, क्षेत्र मिळणे आवश्‍यक आहे. अशी उत्पादकता मिळाली तरच लवकर खरेदीचा मार्ग सुकर होऊ शकतो.  

नोंदणीतील गोंधळामुळे अडचणी

  • खरेदी केंद्रांची नावे अंतिम करण्यास विलंब
  • अनेक ठिकाणी केंद्र चालविण्यासाठी संस्थांचे प्रस्तावच अंतिम झालेले नाहीत
  • नोंदणीसाठीचा पासवर्ड मिळण्यास लागला आठवडा
  • अनेक केंद्रांना मिळाला गुरुवारी पासवर्ड
  • वेळेत शेतकऱ्यांची नोंदणीसाठी केंद्रांवर तीन ते चार संगणक अवश्यक
  • परंतु प्रत्येक संगणकाला वेगळा पासवर्ड हवा असल्याने अडचण
  • केंद्रांना एकच पासवर्ड पुरविण्यात आल्याने गोंधळाची चिन्हे
  • अनेक ठिकाणी ९ आॅक्टोबरपर्यंत मूग, उडदाचीच होणार नोंदणी

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...