agriculture news in marathi, acb search scam in jalukt shiwar scheme, pune, maharashtra | Agrowon

‘एसीबी’ने शोधला `जलयुक्त`मध्ये घोटाळा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुणे   : कृषी विभागाकडील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात घोटाळा झाल्याचे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आढळून आले आहे. मात्र, कृषी विभागाने गोपनीय फाइल दाबून ठेवत ‘एसीबी’च्या कारवाईलाच ‘प्रतिबंध’ केल्याची माहिती हाती आली आहे.

पुणे   : कृषी विभागाकडील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात घोटाळा झाल्याचे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आढळून आले आहे. मात्र, कृषी विभागाने गोपनीय फाइल दाबून ठेवत ‘एसीबी’च्या कारवाईलाच ‘प्रतिबंध’ केल्याची माहिती हाती आली आहे.

पुणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवारात घोटाळा झाल्याच्या तक्रारी कृषी आयुक्तालयाकडे काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. मात्र, सोनेरी टोळीने या तक्रारींचे चौकशीत रुपांतर होऊ दिले नाही. त्यामुळे या तक्रारी मंत्रालयात पोचल्या. मंत्रालयातील मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवारातील कामकाजाची माहिती घेतली असता कृषी खात्याने नियम धाब्यावर बसवून निधीचे वाटप केल्याचे दिसून आले. ‘‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामांची गुप्त चौकशी केली आहे. या चौकशीत विभागाला तथ्य आढळले आहे,’’ असे मंत्रालयाच्याच एका पत्रात (क्रमांक २०१८-प्रक्र-३९३) नमूद करण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांशी याबाबत ‘अॅग्रोवन’ने संपर्क साधला असता जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे. कृषी विभागातील सूत्रांनीदेखील एकाच तालुक्यात तीन कोटींचा घोटाळा झाल्याचा मान्य केले आहे. सर्व तालुक्यांची चौकशी केल्यास २५ कोटींच्या आसपास गैरव्यवहार आढळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘‘आम्हाला तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. मात्र, सखोल चौकशीला कृषी आयुक्तालयाने अजूनही मान्यता दिलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी आदेश दिल्याशिवाय या प्रकरणात आम्हाला पुढे जाता येणार नाही. महासंचालक देखील कृषी आयुक्तांच्या मान्यतेशिवाय कोणतीही भूमिका घेणार नाहीत," असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विभागातून सांगण्यात आले.

घोटाळ्याची फाईल आयुक्तांच्या  नजरेला पडू न देण्याची पद्धतशीरपणे  काळजी घेण्यात आली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मृद संधारण विभागाचे अवर सचिव सु.द. नाईक यांनी कृषी आयुक्तालयातील मृद संधारण संचालकांना पत्र लिहून या प्रकरणी गृह विभागाला उघड चौकशी देण्याबाबत आपला अभिप्राय कळविण्याची सूचना केली होती.

संचालकांनी अहवाल पाठविला नाही
"गृह विभागाला या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी मान्यता देण्याबाबत मृदसंधरण संचालकांनी त्यांचे मत कृषी आयुक्तांच्या संमतीने आमच्याकडे पाठविणे आवश्यक होते. मात्र, संचालकांनी कोणताही अहवाल पाठविला नाही. मधल्या काळात मूळ संचालकावरच पोलिसांनी दुसऱ्या एका घोटाळ्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घोटाळ्याची फाईल मंत्रालयात मागविण्यात आलेली नसून आयुक्तालयातच कागदपत्रे असावीत, अशी माहिती मृदसंधारण सचिवालयाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...