agriculture news in Marathi, According to agri department bowl worm on 3 lakh 20 thousand hecter in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात सव्वातीन लाख हेक्टरवरच बोंड अळी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पंचनामे धरसोड पद्धतीने केले. जी व एच अर्जांचा घोळ घातला गेला. शासन विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देणार आहे. ही भरपाई निम्म्याच शेतकऱ्यांना कशी मिळेल, याचे नियोजन सरकार व सरकारी यंत्रणा आतापासूनच करीत आहेत. हा सगळा सावळा गोंधळ वाटतो. 
- गुलाबसिंग राजपूत, शेतकरी, तळोदा, जि. नंदुरबार

जळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापसाचे पीक हातचे गेले असून, ९० ते ९५ टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत होता. परंतु अलीकडेच कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार खानदेशातील कापसाखालील निम्मे क्षेत्रही गुलाबी बोंड अळीने बाधित झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थातच अधिकाधिक कापूस उत्पादकांना भरपाईपासून किंवा शासन, विमा संस्था आदींच्या निधीपासून वंचित ठेवण्याचा प्रकारच जणू कृषी विभागाने केला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. 

कापसाची उत्पादकता घसरली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक खानदेशात अधिक आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात दोन लाख पाच हजार, जळगाव जिल्ह्यात चार लाख ७५ हजार, तर नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २० हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती.

खानदेशात सुमारे आठ लाख हेक्‍टरवरवर लागवड झाली होती. यापैकी जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ६९ हजार हेक्‍टर, नंदुरबारमधील १० हजार आणि धुळ्यातील फक्त ३७ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. अर्थातच एकूण तीन लाख २० हजार हेक्‍टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीने बाधित झाल्याचे यातून समोर आले आहे. परंतु बाधित क्षेत्र यापेक्षा अधिक असल्याचे शेतकरी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी एच प्रकारचे अर्ज कृषी विभागाकडे दाखल केले होते, त्याची पाहणी जिल्हा तक्रार निवारण समितीने केली आहे. या समितीला खानदेशात दोन हजार ५७२ हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे दिसून आले आहे. 

जळगावमधून अधिक तक्रारी 
कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी जळगाव जिल्ह्यातून अधिक आल्या असून, दोन लाख ८६ हजार ९०० तक्रारी आल्या आहेत. धुळ्यातून २१ हजार ८४८ आणि नंदुरबारमधून सुमारे सात हजार ४०० तक्रारी आल्याची माहिती मिळाली. 

सर्वत्र प्रादुर्भाव; मग क्षेत्र निम्मेच बाधित कसे?
खानदेशात सर्वत्र दिवाळीनंतर कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रकोप झाला. त्याचे सुरवातीला कृषी विभागाचे अधिकारी व संबंधित ९० टक्के क्षेत्र बाधित असल्याचे म्हणत होते. परंतु आता बाधित क्षेत्र निम्मेच कृषी विभागाने कसे व कोणत्या आधारावर दाखविले, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 
 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...