२९ कारखान्यांकडे निघाला फरक

साखर कारखाना
साखर कारखाना

पुणे : शेतकऱ्यांकडून गेल्या हंगामात खरेदी केलेल्या उसाला रंगराजन समितीच्या सूत्रानुसार राज्यातील २९ साखर कारखान्यांनी कमी दर दिला आहे. ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.  २०१५-१६ च्या हंगामात साखर कारखान्यांनी एक एप्रिल २०१६ पासून केलेले ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची माहिती मंडळाच्या बैठकीत राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी ठेवली होती.  २०१६-१७ च्या हंगामात ३१ मार्च २०१७ पर्यंत गाळलेला ऊस आणि साखर उत्पादन याचीही माहिती मंडळाला देण्यात आली.   ऊस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासमोर सी. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०:३० सूत्रानुसार माहिती ठेवण्यात आली. राज्यातील ३० कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर निघूनदेखील नफ्यानुसार एफआरपी किंवा त्यापेक्षा जादा दर दिले आहेत. नफ्याइतका किंवा त्यापेक्षाही जादा दर देण्याची किमया राज्यातील ८० साखर कारखान्यांनी साधली आहे.  राज्यातील २९ साखर कारखान्यांनी मात्र एफआरपी दिली असली तरी या कारखान्यांना नफा जादा झालेला आहे. मात्र, नफ्याप्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलेले नाही. ऊस दर नियंत्रण मंडळाने अजून किती रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल याचा हिशेब मांडून या रकमांना मान्यता दिली आहे.   नफ्याप्रमाणे शेतकऱ्यांना अजून प्रतिटन काही रक्कम बाकी असलेल्या कारखान्यांची नावे अशी : (प्रतिटनासाठी सर्व आकडे रुपयांमध्ये) : अप्पासाहेब नलावडे ः ३३, पंचगंगा रेणुका ः ५० (कोल्हापूर), श्रीराम जवाहर ः ८७ (सातारा), श्रीनाथ म्हस्कोबा ः १५०, बारामती अॅग्रो ः ७०९, दौंड शुगर ः ५५८, व्यंकटेश कृपा ः ६४६ (पुणे), सहकार महर्षी ः १५, विठ्ठलराव शिंदे ः २३१, श्री मकाई ः १४२, सासवडमाळी शुगर ः ३२४, फेबटेकशुगर ः ६, अगस्ती ः १४३, मुळा ः १०१, अंबालिका शुगर ः ३२४ रुपये. शेतकऱ्यांना नफ्याप्रमाणे कमी रक्कम देणाऱ्या यादीत मराठवाड्यातील साखर कारखान्यांनाचा देखील समावेश आहे. यात भाऊराव चव्हाण युनिट चार ः ६१५, भाऊराव चव्हाण युनिट एक ः ५७०(नांदेड), भाऊराव चव्हाण युनिट दोन ः ३९४, (हिंगोली), योगेश्वरी शुगर ः १११८(परभणी), माजलगाव ः १५(बीड), श्रध्दा एनर्जी ः ५४४, समर्थ युनिट एक व दोन ः ८१(जालना), बारामती ॲग्रो ः ९९७, (औरंगाबाद), संतमुक्ताईनगर ः ७४६, चोपडा शेतकरी ः २४५, आस्टोरिया शुगर ः ४६९, (जळगाव), द्वारकाधीश ः १५६, (नाशिक), कादवा  ः१८७ रुपये. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com