agriculture news in marathi, Acquisition of 2253 wells in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

औरंगाबाद  : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव वाड्यांच्या संख्येत भर पडली असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत पाणीपुरवठ्यासाठीच्या विहीर अधिग्रहणात मात्र भर पडली नसल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळते आहे. टॅंकर व टॅंकरविरहित पाणीपुरवठ्यासाठी मराठवाड्यात आजवर २२५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

औरंगाबाद  : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव वाड्यांच्या संख्येत भर पडली असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत पाणीपुरवठ्यासाठीच्या विहीर अधिग्रहणात मात्र भर पडली नसल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळते आहे. टॅंकर व टॅंकरविरहित पाणीपुरवठ्यासाठी मराठवाड्यात आजवर २२५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील ७८५ गावे व १७८ वाड्यांमधील १६ लाख १२ हजार ४३१ लोकांची तहान ९८६ टॅंकरद्वारे भागविली जात आहे. गत आठवड्यात टॅंकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या १० लाख २३ हजार २५६ इतकी होती.  गत आठवड्याच्या तुलनेत टॅंकरवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येत जवळपास १० हजार ८२५ ने घट झाली असली तरी टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टॅंकरच्या संख्येत मात्र मराठवाड्यात किंचीत वाढ नोंदली गेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसते आहे. या जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील सर्वाधिक १०२ गावांत पाणीटंचाई भासत आहेत.

औरंगाबाद तालुक्‍यातील ९१ गावे, २७ वाड्या, फुलंब्री तालुक्‍यातील ६३ गावे ५ वाड्या, पैठण तालुक्‍यातील ४९ गावे ३ वाड्या, वैजापूर तालुक्‍यातील ७१ गावे ४ वाड्या, खुल्ताबाद तालुक्‍यातील ३२ गावे १४ वाड्या, कन्नड तालुक्‍यातील ३५ गावे ८ वाड्या, सिल्लोड तालुक्‍यातील ७२ गावे १३ वाड्या, सोयगाव तालुक्‍यातील ३ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जालना जिल्ह्यात १२८ गावे व १७ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील १८ गावे व ४ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील २२ गावे व १३ वाड्यांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील ७९ गावे व ६६ वाड्या आणि बीड जिल्ह्यातील १८ गावे व ४ वाड्यांना टॅंकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. लातूर जिल्ह्यातील दोन गावांना टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ अधिग्रहीत विहिरींच्या माध्यमातून टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हानिहाय सुरू असलेल्या टॅंकरची संख्या

औरंगाबाद    ६३६
जालना    १५२
परभणी  ३२
हिंगोली      २१
नांदेड  १२२
बीड   २१

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...