agriculture news in marathi, Action against 700 outstanding of Nashik District Bank | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेची ७०० थकबाकीदारांविरुद्ध कारवाई
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

नाशिक : नाशिकला जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक : नाशिकला जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

जिल्हा बॅँकेने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात वसुलीचे उद्दिष्ट पाहता बँकेची एकूण वसुलीस पात्र रक्कम २७६९.६१ कोटी असून, मार्च २०१८ अखेर ५३५.६८ मुद्दल १९ टक्के व व्याजाची रु. २६०.६७ कोटी रक्कम वसूल झाली आहे. बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कर्ज वसुलीसाठी जिल्ह्यातील बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार जंगम जप्तीद्वारे थकबाकीदारांची सुमारे १२५ वाहनांची जप्ती करून लिलावाद्वारे २ कोटी रकमेची वसुली करण्यात आली आहे.

जूनअखेर वसुलीस पात्र २७६९.६१ कोटी रकमेपोटी एकूण मुद्दल रु. ६७३.९४ व व्याज रु. २६८.६० कोटी कर्जवसुली झाली आहे. जूनअखेरपर्यंत जास्तीत जास्त कर्जवसुली होण्यासाठी ऐपतदार थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती करून लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ७०० थकबाकीदारांना स्थावर जप्ती आदेश बजावण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...