चालढकल केल्यास बँकांवर कारवाई : जिल्हाधिकारी काळम-पाटील

चालढकल केल्यास बँकांवर कारवाई ः जिल्हाधिकारी काळम-पाटील
चालढकल केल्यास बँकांवर कारवाई ः जिल्हाधिकारी काळम-पाटील

सांगली : शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत बँकांकडून टाळाटाळ सुरू आहे. पीककर्ज वितरणात चालढकल सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला आहे.

पीककर्ज वितरणात उद्दिष्टापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या बँकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पीककर्ज वितरणामध्ये अनेक बँकांची कामगिरी निराशाजनक असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे एल. एस. कट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज आहे. त्यांची अडवणूक करू नका. पीककर्ज वितरण यंत्रणा गतिमान करा. जिल्ह्यास पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ११०० कोटींचे आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत अनेक बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे. या बँकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राहून पीककर्जाचा पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

बँकांनी केलेले कर्जवाटप आणि उद्दिष्ट बँकांनी पीककर्जवाटपात केलेली कामगिरी व उद्दिष्ट असे : आंध्रा बँक १ कोटी (११ कोटी), विजया बँक ५४ लाख (५ कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक ९ लाख (२ कोटी), युनियन बँक १७ कोटी (५४ कोटी), स्टेट बँक ऑफ इंडिया १९ कोटी (६९ कोटी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया १ कोटी (१७ कोटी), बँक ऑफ महाराष्ट्र ३७ कोटी (७० कोटी), बँक ऑफ बडोदा १५ कोटी (२४ कोटी), आयडीबीआय २ कोटी (१० कोटी), रत्नाकर बँक ४ कोटी (५९ कोटी), आयसीआयसीआय बँक ३३ कोटी (१२८ कोटी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com