agriculture news in marathi, Action on the headmasters if nutrition is found to be poor | Agrowon

पोषण आहार खराब आढळल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ, डाळ आदी धान्य उतरविताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे स्वीकारलेले ध्यान्य खराब आढळून आल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील. त्यासंबंधी कारवाईदेखील केली जाईल, अशा सूचना शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आल्या.

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ, डाळ आदी धान्य उतरविताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे स्वीकारलेले ध्यान्य खराब आढळून आल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील. त्यासंबंधी कारवाईदेखील केली जाईल, अशा सूचना शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आल्या.

या सभेत सभापती पोपट भोळे, समिती सदस्य गजेंद्र सोनवणे, विजया पाटील, रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, हरीश पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील उपस्थित होते. मुलांना योग्य आहार देण्यासाठी चांगले धान्य स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे धान्य खराब, वजन तपासणीत कमी आढळले किंवा मुदत संपलेले धान्य असल्यास त्यास परत करावे, असेही सांगण्यात आले.

जीर्ण, धोकादायक शाळा निर्लेखित करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर ५१ जिल्हा परिषद शाळांमधील २०६ खोल्यांचे निर्लेखन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३४ शाळा पूर्ण झाल्या असून, २७ शाळा बाकी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर ३६ शाळांचे १९० वर्ग तातडीने निर्लेखित करण्याच्या सूचना सभापती भोळे यांनी दिल्या.

ओपन जिमसाठी मागविले प्रस्ताव
क्रीडा विभागाकडून सहावी ते आठवीचे वर्ग भरणाऱ्या शाळांना मैदान, व्यायाम शाळा किंवा ओपन जिम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींकडे तीन एकरपर्यंत जागा उपलब्ध असल्यास, त्या आपल्या गावातील संस्था, शाळांच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवू शकतील. तसेच ज्या विद्यार्थिनी पाच किलोमीटर अंतरापर्यंत माध्यमिक शाळांमध्ये जातात. त्यांना मानव विकास मिशनअंतर्गत सायकलवाटप केले जाईल. संबंधितांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

प्राथमिक उपचारासाठी ११ लाखांची तरतूद
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१३ ते जून २०१८ पर्यंत ० ते १८ वयोगटातील ३४३ मुलांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर ९३७ विद्यार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. शिवाय शाळेत मुलांना खेळताना काही जखमा झाल्यास प्राथमिक उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटी लावण्यात येणार आहे. याकरिता ११ लाखांची तरतूद असून, या संदर्भात नियोजनाची चर्चा सभेत करण्यात आली.
 

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...